शहरातील एका महिलेसोबत जुलै २०१८ ते ६ एप्रिल २०२१ दरम्यान परळी व गंगाखेड येथे धमकावून अर्जुन मुंडे रा. बडवणी, ता. गंगाखेड याने वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आणि सदर महिलेकडून विश्वासाने आठ लाख रुपये व दोन तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असे एकूण आठ लाख साठ हजार रुपये घेतले व ते परत देण्यास नकार दिला व काठीने मारहाण करून जखमी केले, अशी तक्रार महिलेने दिली होती. त्यावरून ७ एप्रिल रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस ८ एप्रिल रोजी अटक केली. ९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता १२ एप्रिलपर्यंत आरोपीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
अत्याचार, फसवणुकीतील आरोपीला चार दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST