त्या आरोपीला कठोर शिक्षा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST2021-08-18T04:40:38+5:302021-08-18T04:40:38+5:30

बीड : पाटोदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा ...

The accused should be severely punished | त्या आरोपीला कठोर शिक्षा करावी

त्या आरोपीला कठोर शिक्षा करावी

बीड : पाटोदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी १२ ऑगस्ट रोजी केली आहे. पाटोदा तालुक्यातील एका गावात ६ ऑगस्ट रोजी ३० वर्षीय तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून १४ वर्षीय मुलीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करावेत व कठोर शिक्षा करावी, अशी मागणी कमल निंबाळकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी १२ ऑगस्ट रोजी पाटोदा ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश काळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हा सरचिटणीस राणी शेख, तारामती थोरात यांची उपस्थिती होती. दरम्यान, कमल निंबाळकर यांनी आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयाची घरी जाऊन भेट घेत सांत्वन केले.

Web Title: The accused should be severely punished