मुलींसोबत गावी परतणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:23 IST2021-01-01T04:23:24+5:302021-01-01T04:23:24+5:30

कडा : मुलीच्या इंजिनिअरिंगचे ॲडमिशन घेऊन दोन मुलींसह बीडहून घाटापिंपरीकडे दुचाकीवरून परतणाऱ्या पित्याचा कंटेनरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची ...

Accidental death of father returning to village with daughters | मुलींसोबत गावी परतणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू

मुलींसोबत गावी परतणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू

कडा : मुलीच्या इंजिनिअरिंगचे ॲडमिशन घेऊन दोन मुलींसह बीडहून घाटापिंपरीकडे दुचाकीवरून परतणाऱ्या पित्याचा कंटेनरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास बीड धामणगाव रोडवर घडली. आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथील दिलीप रघुनाथ मुळीक हे गुरूवारी सकाळी त्यांच्या कालिंदा व जयश्री या दोन मुलींना घेऊन दुचाकीने (क्र. एमएच २३/एएम १९३०) बीड येथे कालिंदाच्या इंजिनिअरिंग शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास बीड येथे आले होते. त्यानंतर बीडकडून घाटापिंपरीकडे परतत होते. त्यावेळी बीड -धामणगाव -नगर रोडवरील महेंद्रवाडी परिसरात अहमदनगरकडून बीडकडे जाणाऱ्या कंटेनर (क्र. एम. एच. १४, एचजी २६९९) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यात दिलीप रघुनाथ मुळीक (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. कंटेनर चालक पसार झाला आहे.

काळाचा घाला

मोलमजुरी काबाड कष्ट करून मुलींना शिक्षणासाठी धडपड करणारे दिलीप मुळीक घरातील कर्ते होते. मुलीला इंजिनिअर करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र गुरूवारी बीड येथे प्रवेश प्रक्रिया करून घराकडे जाताना काळाने घाला घातला. या अपघातात दोन्ही मुलींचे पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Accidental death of father returning to village with daughters