शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या वाढदिवसाला जाणाऱ्या धारूरच्या पोलीस निरीक्षकाचा कार अपघातात पत्नीसह मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 16:24 IST

पोलीस निरीक्षक जाधव यांचा पुण्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

बीड : पुण्यात राहणाऱ्या मुलीचा बुधवारी वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी धारूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव हे पत्नी सुजाता (४० रा.सांगली ) यांच्यासह जात होते. नगर-पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये जाधव यांची पत्नी जागीच ठार झाली. तर गंभीर जखमी असलेल्या जाधव यांचा सायंकाळी पुण्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

अनिलकुमार जाधव हे सध्या धारूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांची ऐश्वर्या नावाची मुलगी पुण्यात युपीएससीची तयारी करीत आहे. तसेच एका शाळेवर शिक्षिकाही आहेत. ऐश्वर्याचा आज वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी जाधव हे पत्नी सुजाता यांच्यासह कारने (एमएच १० - ८८८९) पुण्याला जात होते. नगर-पुणे महामार्गावर बेलखंडी पोलीस ठाणे हद्दीत गव्हाणवाडी जवळ त्यांच्या कारला अपघात झाला. उभा असलेल्या कंटेनरला कार धडकून रस्त्याच्या खाली  गेल्याने हा अपघात झाल्याचे शिरूर पोलिसांकडून सांगण्यात आले. जाधव हे स्वत: कार चालवित होते तर पत्नी या बाजूला बसलेल्या होत्या. कार डाव्या बाजुला पलटल्याने त्यामध्ये अडकल्या. 

हा अपघात झाल्याची माहिती समजताच बाजूच्या लोकांनी धाव घेत दोघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल केले. उपचारासाठी नेत असतानाच सुजाता जाधव यांची प्राणज्योत मालवली. तर अनिलकुमार जाधव यांचा पुण्यातील खराडी येथील खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस