अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षांचा कारावास, ५० हजाराचा दंडही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 18:16 IST2023-03-27T18:16:11+5:302023-03-27T18:16:21+5:30
सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षांचा कारावास, ५० हजाराचा दंडही
- अविनाश कदम
आष्टी : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच एकाने अत्याचार केल्याची घटना ७ जून २०२१ मध्ये घडली होती. याच प्रकरणात सत्र न्यायालय बीड आरोपीस दोषी ठरवून २० वर्षांचा कारावास व ५० हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिन्याचा साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. सोमवारी हा निकाल दिला.
तालुक्यातील एका गावातील सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी हा नात्यातीलच होता. न्यायालयाने सर्व बाजू तपासून आराेपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक राणी सानप यांनी याचा तपास केला तर सरकारी पक्षातर्फे ॲड.अजय दी. राख यांनी बाजू मांडली.