अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST2021-04-22T04:35:01+5:302021-04-22T04:35:01+5:30

आष्टी : आष्टी तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात २० एप्रिल ...

Abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आष्टी : आष्टी तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात २० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आष्टी तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर संगनमत करून आरोपी भारत आल्हाट याने पाच महिन्यांपूर्वी गाव शिवारातील शेतात पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन वारंवार अत्याचार केला. या घटनेनंतर ती पाच महिन्यांची गर्भवती राहिली होती. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर ‘तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकू’ अशी धमकी त्याने दिली. तर, दत्तू आल्हाट यानेदेखील पीडितेचा मानसिक छळ केला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात या दोन आरोपींविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना पोलीस कोठडी

२१ एप्रिल रोजी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींना हजर केले असता, दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे हे करीत आहेत.

Web Title: Abuse of a minor girl