आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अन्नत्याग, पदयात्रा- A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:35 IST2021-03-09T04:35:50+5:302021-03-09T04:35:50+5:30

दिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, खानापूर, कळमनुरी, मालेगाव, बाभळी, शेंबाळ पिंपरी, मुळावा, पळशी, कृषी महाविद्यालय, मरसुळ, उमरखेड, सुकळी, नांदगव्हाण, बिजोरा, मुडाना, ...

Abstinence, Padayatra-A to pay homage to the farmers who committed suicide | आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अन्नत्याग, पदयात्रा- A

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अन्नत्याग, पदयात्रा- A

दिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, खानापूर, कळमनुरी, मालेगाव, बाभळी, शेंबाळ पिंपरी, मुळावा, पळशी, कृषी महाविद्यालय, मरसुळ, उमरखेड, सुकळी, नांदगव्हाण, बिजोरा, मुडाना, महागाव, चिलगव्हाण या मार्गाने ही पदयात्रा जाणार आहे. करोनाबाबतचे सर्व निकष तंतोतंत पाळले जातील, असे सांगून या यात्रेकरूंनी सांगितले की, हा आमचा व्यक्तिगत निर्णय आहे. अन्य यात्रेकरूही आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर या यात्रेत सहभागी होऊ शकतात.

चिलगव्हाण येथे अन्नत्याग

अमर हबीब आणि अनंत देशपांडे हे यावर्षी चिलगव्हाण येथे अन्नत्याग (उपवास) करणार आहेत. त्यांनी सांगितले की, गतवर्षी त्यांनी पुण्यात फुलेवाड्याला भेट देऊन बालगंधर्वसमोर लहानलहान गटात बसून अन्नत्याग केला होता. त्याचप्रमाणे यावर्षी चिलगव्हाण येथे अन्नत्याग (उपवास) करणार आहेत. २०१७ मध्ये त्यांनी चिलगव्हाणला भेट देऊन महागाव येथे उपोषण केले होते. चिलगव्हाण हे साहेबराव करपे यांचे गाव आहे. १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, दरवर्षी १९ मार्च रोजी लाखो संवेदनशील नागरिक एक दिवस अन्नत्याग करतात. यावर्षीही हजारांहून अधिक शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला. म्हणून यावर्षी नागरिकांनी अन्नत्याग करून आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन अमर हबीब यांनी केले आहे.

Web Title: Abstinence, Padayatra-A to pay homage to the farmers who committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.