अबब, सव्वालाख लोकांना कोरोना झालेला समजलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST2021-02-07T04:31:57+5:302021-02-07T04:31:57+5:30

बीड : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत तीनवेळा सर्वेक्षण केले आहे. तिसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील ४२१ लोकांचे रक्तनमुने ...

Above all, millions of people don't understand coronation | अबब, सव्वालाख लोकांना कोरोना झालेला समजलाच नाही

अबब, सव्वालाख लोकांना कोरोना झालेला समजलाच नाही

बीड : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत तीनवेळा सर्वेक्षण केले आहे. तिसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील ४२१ लोकांचे रक्तनमुने तपासले होते. याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला आहे. यात ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून याचे प्रमाण २३.२८ टक्के एवढे आहे. यावरून सव्वालाख लोकांना कोरोना होऊन गेल्याचे उघड झाले आहे. यात ग्रामीणपेक्षा शहरांतील प्रमाण अधिक आहे.

आयसीएमआरच्या वतीने सेरो सर्वेक्षण करण्यासाठी राज्यातील बीडसह परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगाव हे सहा जिल्हे निवडले होते. २१ मे ते ३० मे दरम्यान पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान दुसरा टप्पा तर २३ ते २९ डिसेंबरदरम्यान तिसरा टप्पा पार पडला होता. या सर्वेक्षणात नागरिकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टिबॉडीज तयार होत आहेत का, याचे संशोधन करण्यात आले. बीड जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात ४२१ लोकांचे रक्तनमुने तपासले होते. यावेळी आरोग्यकर्मींचीही निवड केली होती. यात ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी ही माहिती देण्यात आली.

लॉकडाऊन शिथील झाल्याने संख्या वाढली

पहिला व दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण झाले तेव्हा राज्यात सर्वत्र लॉकडाऊन होते. त्यामुळे समूहसंसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळेच पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्याही नगण्य होती. परंतु, तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन शिथील झाले आणि संख्याही वाढली. यात समूहसंसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होते.

-----

तीन टप्प्यात काय आढळले?

पहिल्या टप्प्यात ४०० लोकांची चाचणी केली. यात ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. याचे प्रमाण केवळ १ टक्का होते. दुसऱ्या टप्प्यात ४४३ लोकांची चाचणी केली. यात ३३ अहवाल पॉझिटिव्ह आले. याचे प्रमाण ७.४ टक्के एवढे होते. आणि आता तिसऱ्या टप्प्यात ४२१ लोकांची चाचणी केली. यात ९८ अहवाल पॉझिटिव्ह आले असून याचे प्रमाण २३.२८ टक्के एवढे आहे.

---

कोट - फोटो

आयसीएमआरच्या वतीने केलेल्या सेराे सर्व्हेचा तिसऱ्या टप्प्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ४२१ चाचण्यांमध्ये ९८ अहवाल पॉझिटिव्ह आले. याचे प्रमाण २३.२८ टक्के एवढे आहे. पहिल्या दोन टप्प्यात लाॅकडाऊन होते. तिसऱ्या टप्प्यात ते शिथील झाला आणि समूहसंसर्ग झाल्याने पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली. अजूनही नागरिकांनी गाफील न राहता कोरोनाबाबत काळजी घ्यावी.

डॉ. आर. बी. पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

----

तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारी

गाव चाचणीपॉझिटिव्ह टक्का

हिंगणी ४० ७१७.५०

पांगरी ४४ ६१३.६४

आमला ४० २५.००

टालेवाडी ४१ ८१९.५१

पिंपळनेर ४५ १० २२.२२

चंदनसावरगाव ४२ ९२१.४३

मोहा ४१ १३ ३१.७१

नंदनगाव ४५ ९२०.००

बीड प्र. २३ ४१ १८ ४३.९०

परळी प्र. ३० ४२ १६ ३८.१०

एकूण ४२१ ९८ २३.२८

Web Title: Above all, millions of people don't understand coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.