‘युनिक’चा अभिषेक भिलारे जिल्ह्यात पहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:49+5:302021-03-10T04:33:49+5:30
बीड: येथील युनिक अकॅडमीच्या ११ वी, १२ वी मॅथमॅटिक्सने यशाची परंपरा कायम राखली आहे. ८मार्च रोजी जेईई पेपर ...

‘युनिक’चा अभिषेक भिलारे जिल्ह्यात पहिला
बीड: येथील युनिक अकॅडमीच्या ११ वी, १२ वी मॅथमॅटिक्सने यशाची परंपरा कायम राखली आहे. ८मार्च रोजी जेईई पेपर १ चा निकाल जाहीर झाला. यामध्ये अकॅडमीचा अभिषेक भिलारे हा ९७.७२ पर्सेंटाईल गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आला आहे.
युनिक अकॅडमीचे संचालक इंजि.हर्षल केकान यांच्या उत्कृष्ट अध्यापन पद्धतीमुळे बीडमधील विद्यार्थी देशपातळीवर चमकत आहेत. गत काळात विविध परिक्षांमध्ये चांगले गुण मिळवत बीडचे विद्यार्थी देशातील नामांकित महाविद्यालयात उच्चशिक्षण घेत आहेत. नुकताच जेईई पेपर १ चा निकाल जाहीर झाला असून यामध्येही युनिक अकॅडमीने यशाची परंपरा कायम राखली आहे. अभिषेक भिलारे याने जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर मॅथमॅटीक्समध्ये सयाजी शिंदे याने ९७.२२ पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. मॅथमॅटीक्समध्ये अनघा पवारला ८८.७ पर्सेंटाईल, मानसी मधुरकरला ८७.०८ गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा इंजि.हर्षल केकान यांनी सत्कार केला. कोरोनाच्या संसर्गामुळे शैक्षणिक क्षेत्रातही अडचणी येत असतानाही विद्यार्थ्यांनी सचोटीने आणि जिद्दीने अभ्यास केल्यामुळे यश मिळाल्याचेही हर्षल केकान यावेळी म्हणाले.
===Photopath===
090321\092_bed_16_09032021_14.jpeg
===Caption===
जेइइ परीक्षा -१ मध्ये जिल्ह्यात प्रतम आलेल्या अभिषेक भिलारे याचा सत्कार करण्यात आला.