बीड : महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ओळख झाली. त्यानंतर पे्रमाच्या जाळ्यात ओढून अपहरण केले आणि नंतर अत्याचार. ही घटना नुकतीच उघडकीस आली असून औरंगाबादच्या दोन तरूणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दिलीप अंबादास निकाळजे (२१, रा. कबीरनगर, उस्मानपुरा, औरंगाबाद) व प्रशांत मिलिंद गाडगीळ (१९, रा. सातारा परिसर, बीड मिनी बायपास, औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. बीड येथील पीडित १६ वर्षीय मुलगी औरंगाबादेत शिक्षण घेत होती. तिथेच तिची दिलीपसोबत ओळख झाली. ती बीडला आल्यावर दिलीपने तिला पळवून नेले होते. याप्रकरणाची शिवाजीनगर ठाण्यात नोंद झाली होती. त्यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेतल्यावर ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर तिने आपल्यावर दिलीपने अत्याचार केला असून प्रशांतने त्याला सहकार्य केल्याचा जबाब दिला. त्यानंतर अपहरणाच्या गुन्ह्यात आता बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचे कलम वाढविले आहेत. तपास पोउपनि महेबुब काझी हे करीत आहेत. दरम्यान न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अपहरण करून मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:25 IST
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ओळख झाली. त्यानंतर पे्रमाच्या जाळ्यात ओढून अपहरण केले आणि नंतर अत्याचार. ही घटना नुकतीच उघडकीस आली असून औरंगाबादच्या दोन तरूणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अपहरण करून मुलीवर अत्याचार
ठळक मुद्देदोघांविरोधात गुन्हा । महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान झाली ओळख