बीडमध्ये सलग तिस-या दिवशीही एआरटीओ कार्यालय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:16 IST2018-01-04T00:15:41+5:302018-01-04T00:16:06+5:30
अपुरे कर्मचारी व अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाºयांच्या अनास्थेमुळे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सलग तिसºया दिवशीही बंद होते. परिणामी शासनाच्या वाहन कराच्या रुपाने मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडाला.

बीडमध्ये सलग तिस-या दिवशीही एआरटीओ कार्यालय बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अपुरे कर्मचारी व अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाºयांच्या अनास्थेमुळे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सलग तिस-या दिवशीही बंद होते. परिणामी शासनाच्या वाहन कराच्या रुपाने मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडाला.
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असते. सध्या या कार्यालयाचा प्रभारी पदभार जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सलीम शेख यांच्याकडे आहे. परंतु, ते दोन- दोन आठवडे येत नसल्याने कार्यालयाचे प्रशासन कोलमडले आहे. त्यात अपुरे कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कामांचा ताण तसेच दबाव वाढत आहे.
अधिका-यांच्या अनुपस्थितीमुळे वाहनांची पासिंग होत नसल्याने वाहनधारक वैतागले आहेत. तर ट्रान्सफर, नोंदणी, कर वसुली, कर्जाचा बोजा चढविण्याचे कामकाज पूर्णत: ठप्प आहे. सोमवारी, मंगळवार आणि बुधवारी या कारणांमुळे कार्यालयाचे काम बंद असल्यातच जमा होते. येथील कर्मचाºयांनी औरंगाबाद येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात वरिष्ठांना भेटून कैफियत मांडली. कामे वेळेत होत नसल्याने विचारणा करणाºया नागरिकांकडून प्रश्नांचा भडिमार केला जातो. त्यामुळे जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
त्यानंतर मंगळवारी दुपारी प्रभारी अधिकारी शेख बीडला आले. परंतु, अर्धा तास थांबून ते परत गेले. त्यानंतरही कार्यालयाचे कामकाज सुरु होऊ शकले नाही. सहायक वाहन निरीक्षक, मुंडे, आवाड हे दोघेच हजर होते. त्यांच्याकडे लर्निंग लायसनचे काम असते. मंगळवारीही या कार्यालयाचे कामकाज ठप्प होते. परिणामी तीन दिवसात शासनाला एक रुपयाही महसूल मिळाला नाही. ज्या अधिकाºयाकडे पदभार आहे, ते कधीही येत नाही. ते उंटावर बसून शेळ्या राखत आहेत. बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करण्याची मागणी भारिप बहुजन पक्षाचे नेते अॅड. बक्शू अमीर शेख यांची मागणी केली आहे.
वारंवार कामकाज बंद
बीड येथील उपप्रादेािक परिवहन कार्यालयाला मागील आर्थिक वर्षात ३२ कोटी रुपयांचे उद्दिट्य होते. सुमारे ३४ कोटी रुपयांचा महसून या कार्यालयाने गतवर्षी जमा केला होता. चालू वर्षात वारंवार कामकाज बंदमुळे महसूलचा आलेख घटणार असून जानेवारीच्या पहिल्या सोमवार ते बुधवार या तीन दिवसात सुमारे ३० लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.