आम आदमी पक्षाची चौथ्या दिवशीही ‘गांधीगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST2021-01-18T04:30:58+5:302021-01-18T04:30:58+5:30

बीड : आम आदमी पक्षाकडून नगरपरिषदेच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करणे सुरूच आहे. चौथ्या रविवारी चमन गार्डनमधील महापुरुषांच्या ...

Aam Aadmi Party's fourth day 'Gandhigiri' | आम आदमी पक्षाची चौथ्या दिवशीही ‘गांधीगिरी’

आम आदमी पक्षाची चौथ्या दिवशीही ‘गांधीगिरी’

बीड : आम आदमी पक्षाकडून नगरपरिषदेच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करणे सुरूच आहे. चौथ्या रविवारी चमन गार्डनमधील महापुरुषांच्या स्मारक परिसरात आम आदमी पक्षाने स्वच्छता केली. यावेळी महापुरुषांचे पुतळे, अडगळीतील स्मारके यांची नगर परिषद दुरुस्ती, स्वच्छता कधी करणार? असा सवाल जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी उपस्थित केला.

यावेळी अशोक येडे यांनी, नगरपरिषदेच्या कारभारावर टीका करून पालिका काही लोकांच्या सूचनांवरून चालत असून त्यांना बीडकरांचे काहीएक देणे-घेणे राहिलेले नसल्याचे सांगितले. आम आदमी पक्ष प्रत्येक रविवारी बीड नगरपरिषदेच्या अस्वच्छ कारभाराला असेच बीडकरांच्यासमोर आणणार आहे. बीडकरांनी स्वतःहून या अभियानात सहभागी व्हावे, असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सचिव रामधन जमाले, संघटन मंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत, बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक, प्रा. संदीप गाडगे, ईश्वर आमटे, अभिषेक टाळके, स्वप्निल गायकवाड, योगेश पवळ, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Aam Aadmi Party's fourth day 'Gandhigiri'