धारूर (बीड): परभणीहून धारूरमार्गे पुढे जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने, एकाच कुटुंबातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना तेलगाव-धारूर रस्त्यावर धुनकवड फाट्याजवळ घडली आहे. यात पती-पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा समावेश असून, त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे तेलगावहून केजकडे जात असताना, त्यांच्या ताफ्यातील ऑक्सिजन गाडी (क्र. MH 02 GH 5732) चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत आहे. भोगलवाडी येथील विष्णू सुदे यांच्या दुचाकीला (क्र. MH 44 V 1518) ताफ्यातील ऑक्सिजन टँकर असलेल्या वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात विष्णू सुदे, त्यांची पत्नी कुसुम सुदे, आणि त्यांच्या दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
तात्काळ अंबाजोगाईकडे हलवलेअपघात होताच जखमींना तातडीने धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, त्यांच्या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरूया घटनेमुळे तेलगाव-धारूर रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ताफ्यातील गाड्यांच्या वेगामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, एका सामान्य कुटुंबावर आलेल्या या संकटाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन चालक आणि वाहनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Web Summary : A vehicle from Ajit Pawar's convoy struck a motorcycle near Dharur, injuring a family of four. The incident, involving an oxygen vehicle, left a couple and their two daughters seriously hurt. They are receiving treatment in Ambajogai. Police are investigating the accident.
Web Summary : धारूर के पास अजित पवार के काफिले के एक वाहन ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे एक परिवार के चार सदस्य घायल हो गए। ऑक्सीजन वाहन से हुई इस घटना में एक दंपति और उनकी दो बेटियां गंभीर रूप से घायल हो गईं। उनका अंबाजोगाई में इलाज चल रहा है। पुलिस दुर्घटना की जांच कर रही है।