शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षांबाबत सस्पेन्स, २६ जूनला होणार मतदान; कोण होणार लोकसभेचा स्पीकर
2
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
3
अजित डोवाल यांच्यावरच पंतप्रधान मोदींचा विश्वास; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसरी टर्म
4
“२५० जागांवर तयारीचे राज ठाकरेंचे आदेश, स्वबळावर विधानसभा निवडणूक...”: बाळा नांदगावकर
5
ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...”
6
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
7
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
8
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
9
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
10
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
11
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
12
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
13
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
14
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
15
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
16
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
17
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
18
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
19
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
20
ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 

बीड लोकसभेच्या मैदानात होऊ शकते तिरंगी लढत; वंचित उमेदवार देणार का?

By अनिल भंडारी | Published: April 02, 2024 12:12 PM

भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचे जिल्ह्यात दौरे सुरू, ‘मविआ’कडून अद्याप घोषणा नाही

बीड : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांनी रणांगणावर लढण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषित केली असली तरी अद्याप महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा केलेली नाही. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचेही सूर जुळण्याची शक्यता नाही. ही परिस्थिती कायम राहिली तर बीड लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. दोन टर्म त्या खासदार राहिल्या. परंतु यावेळच्या निवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी घोषित केली. परंतु भाजपविरोधात महाविकास आघाडीकडून १ एप्रिलपर्यंत उमेदवार निश्चित अथवा जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळू शकते, असा कयास लावला जात होता. यातच शिवसंग्रामच्या ज्योती विनायक मेटे यांनीही शरद पवार, जयंत पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली. परंतु उमेदवारीबाबत अद्याप निर्णय बाकी आहे.

दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात समेट झालेला नाही. सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्यास वंचित तयार आहे, परंतु त्या बदल्यात काँग्रेसला अकोल्यासाठी समर्थन मागणार नसल्याची भूमिका ‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली आहे. एकंदर परिस्थितीवरून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल्यानंतर बीडच्या राजकीय मैदानात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार मैदानात उतरविला जाऊ शकतो. जर तसे झाले तर या मतदारसंघात तिरंगी लढत होऊ शकते, असे मानले जात आहे.

गत लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे, रा. काँ. पक्षाचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव या प्रमुख उमेदवारांत लढत झाली होती. शिवाय, पाच अपक्ष, एचबीपी व एक एमएएचकेआरएसचे उमेदवार होते. या निवडणूक निकालानुसार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ९२ हजार १३९ मते मिळाली होती. मागील पाच वर्षांत ‘वंचित’चे वाढलेले संघटन, मतदारसंघातील व राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता जर ‘वंचित’चा उमेदवार मैदानात आला तर लढतीची चुरस वाढू शकते, अर्थात उमेदवार कोण येतो, यावरही तितकेच अवलंबून आहे.

२०१९ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निकालप्रीतम गोपीनाथ मुंडे- भाजप- ६,७८,१७५बजरंग मनोहर सोनवणे- राकाँपा- ५०९८०७प्रा. विष्णू जाधव - वंचित ब. आघाडी- ९२,१३९संपत रामसिंग चव्हाण- अपक्ष- १६,७४२मुजीब नैमुद्दीन इनामदार- अपक्ष- ६,१५२राजेशकुमार भातगले- अपक्ष- ३,८९७जगताप नीलेश मुरलीधर- अपक्ष- ३,४८५विजय रंगनाथ साळवे- अपक्ष- ३,४५७अशोक भागुजी थोरात- एचबीपी- ३,३५१गणेश नवनाथ करांडे- एमएएचकेआरएस- २,७६१नोटा--- २,५००

टॅग्स :BeedबीडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४