शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवशीच समाज कल्याण अधिकाऱ्यास पत्नी-मुलाकडून भररस्त्यात मारहाण

By शिरीष शिंदे | Updated: June 13, 2024 18:58 IST

या प्रकरणी तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बीड : पोटगीचे पैसे का देत नाहीस, असे म्हणत जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी रविकांत शिंदे यांना त्यांच्या मुलासह पत्नीने मारहाण केली. ही घटना बीड शहरातील पाण्याची टाकी परिसरातील भगवान बाबा चौकातील एका दुकानासमोर १० जून रोजी सांयकाळी ६:३० वाजता घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

समाज कल्याण अधिकारी रविकांत शिंदे यांचा १० जून रोजी वाढदिवस होता. त्यामुळे शिंदे हे केक घेण्यासाठी भगवान बाबा चौक परिसरातील एका दुकानात गेले होते. त्यावेळी तेथे शिंदे यांचा मुलगा महेश, पत्नी अनिता व मेहुणा गंगाधर तुकाराम कांबळे हे तिघे तेथे आले. महेश याने रविकांत यांच्या कॉलरला धरून बाहेर काढले. तुम्ही आम्हाला पोटगीचे पैसे का देत नाहीत, असे म्हणून महेश व पत्नी अनिता यांनी मारहाण केली. तसेच तिघांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महेश रविकांत शिंदे, अनिता रविकांत शिंदे व गंगाधर तुकाराम कांबळे (सर्व रा. राजगृह निवास, टिळकनगर, अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

घटस्फोटाचा अर्ज प्रलंबितसमाज कल्याण अधिकारी रविकांत शिंदे यांनी ३ जून रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांना अर्ज केला होता. पत्नी अनिता ही माझ्यापासून विभक्त राहत आहे. अंबाजोगाई येथील न्यायालयामध्ये घटस्फोटाचा अर्ज दिला आहे. मी माझ्या मुलांची शैक्षणिक फीस भरत आहे, तसेच पत्नीस दरमहा खर्च देत आहे. तिचे नातेवाईक माझ्या आईच्या घरामध्ये राहत आहेत व माझ्या आईला घराबाहेर हाकलून दिले आहे. त्यामुळे माझ्या पत्नीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी अर्जात केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड