लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीसाठी परळीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2022 18:33 IST2022-12-29T18:32:52+5:302022-12-29T18:33:17+5:30

राज्यासह देशात धर्मांतरण विरोधी कायदा आणावा, लव्ह जिहाद विरोधी सरकारने कडक पावले उचलावीत

a march in Parli to demand an anti-conversion law and Love Jihad | लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीसाठी परळीत मोर्चा

लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीसाठी परळीत मोर्चा

परळी : लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज दुपारी परळीत हिंदू धर्मरक्षण मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चात शहरातील व्यापारी आपले दुकाने बंद ठेवून सहभागी झाले. अतिविराट मोर्चाने परळी दणाणली होती. 

राज्यासह देशात धर्मांतरण विरोधी कायदा आणावा, लव्ह जिहाद विरोधी सरकारने कडक पावले उचलावीत यासाठी परळी येथे गुरुवारी सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी एक महिन्यापासून तयारी सुरू होती. सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकात हिंदू बांधव जमायला सुरुवात झाले. मोर्चाला पाठिंबा देत व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवले. मोर्चात महिला, अबालवृद्ध उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.
सकाळी दहाच्या दरम्यान निघालेला मोर्चा राणी लक्ष्मीबाई टॉवर, बाजार समिती, अग्रवाल लॉज, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जलालपूर रोड, विद्यानगर परिसर मार्गे तहसील परिसरात मोर्चा धडकला. शिष्टमंडळाने तहसिलदारांना निवेदन सादर केले.

Web Title: a march in Parli to demand an anti-conversion law and Love Jihad