पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदी पात्रात भाविक बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 13:21 IST2023-08-11T12:28:35+5:302023-08-11T13:21:00+5:30
बुडालेला भाविक जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे

पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदी पात्रात भाविक बुडाला
माजलगाव : अधिक मास निमित्त पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा शुक्रवारी सकाळी गोदावरी नदी पात्रात आंघोळ करताना पाण्यात बुडाल्याची घटना घडली. मारुती खवल असे भाविकाचे नाव असून ते जालना जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या अधिक मासचा महिना सुरू असल्यामुळे पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. शुक्रवारी सकाळी परतुर तालुक्यातील पाटोदा येथील मारुती खवल ( ४८ ) हे आपल्या परिवारासह पुरुषोत्तम पुरी या ठिकाणी आले होते.
सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते गोदावरी नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी उतरले. यावेळी ते अचानक बुडाले लागले. ही बाब जवळपास असलेल्या भाविकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत ते पाण्यात खोलवर बुडाले. त्यानंतर तात्काळ या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी शोधाशोध सुरू केली. अद्याप त्यांचा शोध लागला नाही.