महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

By अनिल भंडारी | Published: January 16, 2024 07:26 PM2024-01-16T19:26:14+5:302024-01-16T19:26:21+5:30

या संदर्भात धारूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A crime against a teacher who demanded sexual favor from a female employee | महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

बीड : जिल्हा परिषदेने केलेल्या निलंबन कारवाईत सहभाग असल्याच्या संशयाने राग मनात धरून आपणास सहा महिन्यापासून त्रास देणाऱ्या शिक्षकाने घराच्या पाठीमागे येऊन विनयभंग केल्याची तक्रार धारूर येथील एका कर्मचारी महिलेने केली. या संदर्भात धारूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारूर तालुक्यातील रमेश विष्णू नखाते (रा. आवरगाव ता. धारूर) याने अंजनडोह केंद्राचे तत्कालिन प्रभारी केंद्रप्रमुख असताना २६ लाख रूपयांच्या अपहार प्रकरणी कलम ४२० भादंविनुसार गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी नखाते यास निलंबित केले होते. दरम्यान निलंबनामध्ये सहभाग असल्याचा समज करून नखाते हा मागील सहा महिन्यापासून त्रास देत होता. तसेच ११ जानेवारी रोजी घरापासून काही अंतरावर भेटून शारीरिक सुखाची मागणी करून धमकी दिल्याचे संबंधित कर्मचारी महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार १५ जानेवारी २०२४ रोजी कलम ३५४, ३५४ (ड), ५०४, ५०६, भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A crime against a teacher who demanded sexual favor from a female employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.