शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यासमोर टाकलेल्या दगडांमुळे कार उलटली, दीड महिन्याच्या बालिकेचा हात तुटून पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 20:14 IST

भरधाव कार पलटी होऊन पाचजण जखमी झाले आहेत

- मधुकर सिरसटकेज (बीड) : केज ते मांजरसुंबा महामार्गावर उमरी शिवारातील बंद असलेल्या टोलनाक्याजवळ वळणरस्ता वापरा फलक न लावताच टाकलेल्या सिमेंटच्या मोठ्या गठ्ठु व दगडावरून आदळून एक भरधाव  कार उलटली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडला. अपघातात दीड महिन्याच्या बालिकेचा हात तुटून पडला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील जाधव कुटुंबातील पाच जण कारमधून लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे ( एम एच 20 / जी क्यू 2949) चालकासह प्रवास करीत होते. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान ही कार केज जवळील  साखर कारखान्या समोरून जाणाऱ्या महामार्गाच्या उतारावरून भरधाव वेगात धावत होती. उमरी शिवारात उभारण्यात आलेला टोलनाका अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे नाक्याजवळ सिमेंटचे मोठे गट्टु आणि दगड टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. संबंधित कंपनी एचपीएमने यासाठी कसलाही दिशदर्शक बोर्ड लावला नाही. त्यामुळे भरधाव वेगात धावणारी कार सिमेंटचे गट्टू आणि दगडाच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळून उलटली. 

या भीषण अपघातात गुरूनाथ दत्ता जाधव 33 वर्षे, प्रतिभा नवनाथ जाधव 34 वर्षे, शाहु नवनाथ जाधव 6 वर्षे, दीड महिन्याची शिवानी नवनाथ जाधव हे पाच जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, आनंद शिंदे, जमादार दत्तात्रय बिक्कड, प्रकाश मुंडे, संतोष गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली. केज येथील रुग्णवाहिका चालक संतोष वळसे यांनी घटनास्थळावरून जखमींना केज येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविले. त्यांतनर अधिक उपचारासाठी जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.

दीड महिन्याच्या शिवानीचा हात तुटला....या अपघातात अवघ्या दीड महिन्याच्या शिवानी नवनाथ जाधव या बालीकेचा उजवा हात दंडापासून तुटून बाजुला पडला होता. हे दृष्य पाहून थरकाप उडत होता. भरधाव वेगातील कार उलटल्याने कारच्या इंजिनच्या अक्षरा ठिकऱ्या उडाल्या. या जखमींपैकी दीड महिन्याची शिवानी नवनाथ जाधव, शाहू नवनाथ जाधव (11)  आणि या दोन्ही बालकांची आई प्रतिभा नवनाथ जाधव (34) या तिघांवर सर्जिकल अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे अधिष्ठाता डॉ. राकेश जाधव यांनी सांगितले. 

अपघात घडताच रस्ता केला खुलाया अपघाताची माहिती होताच एचपीएम कंपनीने शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील सर्व अडथळा दूर करुन वाहनांसाठी महामार्ग खुला केला, अशी माहिती कनिष्ठ अभियंता विकास देवळे यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड