शेतात शेळ्या चारणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; दोन अल्पवयीन मित्र पोलिसांच्या ताब्यात
By सोमनाथ खताळ | Updated: August 31, 2023 19:10 IST2023-08-31T19:10:29+5:302023-08-31T19:10:42+5:30
दोन्ही अल्पवयीन मुलांना पाेलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे

शेतात शेळ्या चारणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; दोन अल्पवयीन मित्र पोलिसांच्या ताब्यात
नेकनूर : दोन अल्पवयीन मित्रांनी शेतात शेळ्या चारणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. पीडिता ओरडत असल्याने तिला चिल्लारीच्या फोकाने मारहाण करण्यात आली. ही घटना बीड तालुक्यातील एका गावात घडली असून दोन अल्पवयीन मित्रांवर नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
१३ वर्षिय मुलगी रोज शेळ्या घेऊन शेतात चारण्यासाठी जात होती. हे गावातीलच दोन अल्पवयीन मित्रांना माहिती होते. २८ ऑगस्ट रोजी हे दोघेही पिडितेजवळ आले. तिच्याकडे पाणी प्यायला मागितले. पीडिता नाही म्हणताच एकाने तिला बाजूलाच असलेल्या बाजरीच्या शेतात नेले. तिच्यावर अत्याचार केला. पीडिता ओरडत असल्याने तिला फोकाने मारहाण करण्यात आली. हा सर्व आरडाओरडा पाहून पीडितेची आजी धावत आली. आजी येत असल्याचे पाहून दोघांनीही तेथून पळ काढला.
हा प्रकार घडल्यावर पीडिता घरी गेली. परंतू तिने आईला काहीही सांगितले नाही. परंतू शेळ्या शेतात बांधलेल्या असल्याने आई ओरडली. त्यावर पीडितेन तुला आजीने शेतात बोलावले असून तु चल म्हणत आईच्या हाताला धरून शेतात नेले. त्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. परंतू आपल्या मुलीची बदनामी होईल, या भितीने पीडितेच्या आईने तक्रार दिली नाही. अखेर ३० ऑगस्ट रोजी आईने नेकनूर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून दोन्ही अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.