८८७ कोरोनामुक्त, ७०३ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:34 IST2021-05-27T04:34:58+5:302021-05-27T04:34:58+5:30
जिल्ह्यात मंगळवारी ५ हजार ५०१ जणांची चाचणी केली गेली. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात ७०३ नवे रुग्ण ...

८८७ कोरोनामुक्त, ७०३ नवे रुग्ण
जिल्ह्यात मंगळवारी ५ हजार ५०१ जणांची चाचणी केली गेली. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात ७०३ नवे रुग्ण आढळले तर, ४ हजार ७९८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ४२, आष्टी ९२, बीड २२६, धारुर २५, गेवराई ६६, केज ६४, माजलगाव ३०, परळी १५, पाटोदा ४६, शिरुर ६३ व वडवणी तालुक्यातील ३३ जणांचा समावेश आहे. दरम्यान, मागील २४ तासात ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ८२ हजार ५७२ इतकी झाली असून, पैकी ७६ हजार ७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १९१६ जणांचा बळी गेला आहे. सध्या ५ हजार ५८० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.