शेतकऱ्यांच्या खात्यातून चाेरलेले ८६ हजार परत; सायबर पोलिसांनी एकाला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 08:13 IST2023-06-06T08:12:32+5:302023-06-06T08:13:19+5:30
सायबर पाेलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यातून चाेरलेले ८६ हजार परत; सायबर पोलिसांनी एकाला केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: दोन शेतकऱ्यांच्या खात्यातून ऑनलाइन रक्कम हडपणाऱ्या एका सायबर भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन गुन्ह्यातील ८६ हजार रूपये रक्कमही तक्रारदाराला परत करण्यात आली आहे. बीड सायबर पाेलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.
राजभाऊ दिनकर पानगुडे (रा. रूई, ता. धारूर) यांचे ७ ते १३ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान खात्यावरून ५६ हजार रुपये गायब झाले होते. याप्रकरणी ५ डिसेंबर २०२२ रोजी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो सायबर ठाण्यात वर्ग करण्यात आला. यात पोलिसांनी योग्य तपास करत गणेश खरसाने (२५, रा. मलकापूर, जि. बुलढाणा) याला गावात जाऊन बेड्या ठाेकल्या. त्याने वेगवेगळ्या माध्यमातून खर्च केलेले ५६ हजार रूपये वसूल करून जप्त करण्यात आले. संबंधित शेतकऱ्याला हे पैसेही परत करण्यात आले.