बीड जिल्ह्यातील ८२ प्रकल्प कोरडे, ४६ जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:05 AM2019-03-19T01:05:39+5:302019-03-19T01:07:28+5:30

जिल्ह्यातील ८२ प्रकल्पामधील जलसाठे कोरडे झाले आहेत. तसेच जोत्याखाली पाणीसाठा आसेलेल प्रकल्पांची संख्या ४६ वर पोहचली आहे.

82 projects in Beed district, dry up and 46 coaches | बीड जिल्ह्यातील ८२ प्रकल्प कोरडे, ४६ जोत्याखाली

बीड जिल्ह्यातील ८२ प्रकल्प कोरडे, ४६ जोत्याखाली

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील स्थिती चिंताजनक : टँकरची संख्या ५७० च्या पुढे, प्रशासनाचे नियंत्रण झाले कमी, नियमांकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष

बीड : जिल्ह्यातील ८२ प्रकल्पामधील जलसाठे कोरडे झाले आहेत. तसेच जोत्याखाली पाणीसाठा आसेलेल प्रकल्पांची संख्या ४६ वर पोहचली आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची संख्या मात्र वाढतच चलाली आहे. प्रकल्पामधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे प्रशासनापुढील आव्हाने वाढली आहेत.
बीड जिल्ह्यात २ मोठे, १६ मध्यम, १२६ लघु असे १४४ प्रकल्प आहेत. त्यापैकी ८२ प्रल्प कोरडे पडले आहेत. तर ४६ प्रकल्पांमधील पाणीसाठा हा जोत्याच्या खाली पोहचला आहे. माजलगांव, मांजरा हे दोन मोठे प्रकल्प तर सिंदफणा, बिंदुसरा, बेलपारा, महासांगवी, मेहेकरी, कडा, कडी, रूटी, कांबळी, वाण, बोरणा, कुंडलीका, बोधेगाव, सरस्वती, वाघेबाभूळगांव असे १६ लघु प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील १४४ प्रकल्पाची पाणी क्षमता ११३७ दलघमी आहे. पैकी फक्त ११ दलघमी इतका पाणीसाठा उपयुक्त आहे.
प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे व टँकरची संख्या वाढल्यामुळे पुढील दोन ते अडीच महिने कसे काढायचे हा देखील प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे.
जिल्ह्यात सद्य: परिस्थिमध्ये ५७० टँकरच्या माध्यमातून ४४३४ गावे व १८७ वाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक प्रकल्पातील पाण्यांवर टँकरची मदार आहे. तसेच ज्या ठिकाणी विहिरींना पाणी उपलब्ध आहे त्याठिकाणी १५१ विहीरींवरुन टँकर पाणीपुरवठा करत आहे. तसेच टँकर व्यतीरिक्त ५४७ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
पाणी टंचाईमध्ये नागरिकांना संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. मात्र कंत्राटदारांकडून नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे काही ठिकाणी टँकरच्या खेपा कमी होत असल्यामुळे पाण्यावाचून नागिरकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी देखील काही गावांमधून आल्याची माहिती आहे. त्यामुळे कमी होत असलेला पाणीसाठा व वाढत असलेली टँकरची संख्या याचा मेळ घालून टंचाईवर मात करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे उभे राहिले आहे. येत्या १५ दिवसात टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
विभागीय आयुक्त घेणार आढावा
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये टंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर प्रशासच्या माध्यमातून योग्य तपासणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मात्र, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर देखील जिल्हा दौºयावर येणार असून छावणी व टँकर, रोहयो यासह इतर उपाययोजनांची पाहणी करणार असून गौरप्रकरा आढळ््यास संबंधीत अधिकाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Web Title: 82 projects in Beed district, dry up and 46 coaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.