शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

दिंड्यांविना परळीनगरी सुनीसुनी, आषाढी वारीला परळीमार्गे विदर्भातून पंढरपूरकडे जात होत्या ८० दिंड्या, कोरानामुळे बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

पूर्वी आषाढी वारीमुळे परळीमार्गे निघणाऱ्या दिंड्यांमुळे एक महिना हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंगांचा निनादामुळे परळी शहर चैतन्यमय असते; परंतु कोरोना ...

पूर्वी आषाढी वारीमुळे परळीमार्गे निघणाऱ्या दिंड्यांमुळे एक महिना हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंगांचा निनादामुळे परळी शहर चैतन्यमय असते; परंतु कोरोना महामारीने गेली दोन वर्षे झाली पंढरपूरकडे जाणारी वारी दिंडी बंद असल्याने भाविक या भक्ती अमृतरसाला मुकले आहेत. त्यात प्रभू वैद्यनाथ मंदिरही फेब्रुवारीपासून बंद आहे. अगोदरच नैराश्यात असणारे लोक या धार्मिक बंधनामुळे अधिक गर्तेत अडकत आहेत. शासनाने काही नियम व अटी घालून मंदिर उघडे करावे, अशी मागणी भाविक गोपाळ आंधळे यांनी केली आहे.

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेऊन वारकरी परळीमार्गे पंढरपूरला आषाढी वारीला जातात. परळीमार्गे दिंड्या विदर्भातून मोठ्या प्रमाणात येत असत. श्री संत गजानन महाराज दिंडी, गुलाब महाराज दिंडी, नामदेव महाराज दिंडी, संत जनाबाई दिंडी यासह विदर्भ, हिंगोली, परभणी जिल्ह्यांतून परळीमार्गे पंढरपूर आषाढी एकादशीला अनेक दिंड्या जातात; परंतु शासनाने कोराेनाच्या पार्श्वभूमीवर या दिंड्यांना परवानगी दिलेली नाही. हे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे दिंडी येत नाही, त्यामुळे भाविकांमध्ये बेचैनीची भावना तयार झाली. शासनाचे नियम असल्यामुळे पाळावे लागत आहेत.

- रामेश्वर महाराज कोकाटे, संगम. ता. परळी

आषाढी वारीला विदर्भातून येणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांची भोजन व राहण्याची सोय वैद्यनाथ मंदिरात श्री वैद्यनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात येत होती; परंतु गेल्या दोन वर्षांपासून दिंड्या येत नसल्याने मंदिर परिसर भक्तांविना सुनासुना झाला आहे.

राजेश देशमुख, सचिव, वैद्यनाथ मंदिर, परळी