७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:23 IST2019-03-02T00:23:04+5:302019-03-02T00:23:41+5:30

घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील वाळू पट्यातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा शुक्रवारी गोंदी पोलिसांनी सकाळी पडकल्याने वाळू तस्करांमध्ये खळबड उडाली आहे.

75 lakh worth of money seized | ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देगोंदी पोलिसांची कारवाई : चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील वाळू पट्यातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा शुक्रवारी गोंदी पोलिसांनी सकाळी पडकल्याने वाळू तस्करांमध्ये खळबड उडाली आहे.
परिसरातील जोगलादेवी वाळू पट्याचा अद्यापही लिलाव झालेला नाही, असे असतांना परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती गोंदी पोलिसांना शुक्रवारी सकाळी मिळाली होती. बेकायदेशीरित्या वाळू घेऊन औरंगाबाद कडे जात असलेले हायवा क्रमांक २० ए.जी. ६८६८, एम. एच २० ए. जी. ७३४७, एम एच १२ एल. टी ०५७४ तीन हायवा जप्त करुन ७५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन हायवा चालक शेख रईस शेख दगडू, रा. सावंगी औरंगाबाद, बबन नामदेव दिंडे, रा. औरंगाबाद, पंडित ज्ञानोबा बोखारे रा. परभणी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: 75 lakh worth of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.