शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बीडमध्ये ४१ लाखांचा गांजा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:26 PM

दोन महिन्यांपूर्वी बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडलेला ४१ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा ६ क्विंटल ८९ किलो गांजा न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी नष्ट करण्यात आला. यातील ट्रक व एक आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वी एलसीबीने केली होती कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोन महिन्यांपूर्वी बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडलेला ४१ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा ६ क्विंटल ८९ किलो गांजा न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी नष्ट करण्यात आला. यातील ट्रक व एक आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे.

हैदराबादहून बीडकडे एका १० टायरच्या ट्रकमधून (एपी १६ टीवाय १२०६) गांजा येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना आदेश देत सापळा लावण्यास सांगितले. त्याप्रमाणे मांजरसुंबा गावात सापळा लावला. एका हॉटेलवर ट्रक थांबताच पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकच्या खाली व टायरच्या बाजूला ६८९ किलो गांजा असल्याचे समजले. पोलिसांनी ट्रकसह एका आरोपीला ताब्यात घेतले होते. याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्याकडे होता.

दरम्यान, मंगळवारी पोलीस मुख्यालयावर हा गांजा नष्ट करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, गणेश मुंढे यांच्यासह गुन्हे शाखा, नेकनूर ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसMarathwadaमराठवाडा