शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

बीडमध्ये कार्यमुक्त २७९ शिक्षकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:11 IST

चार वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त केल्यानंतर या २७९ शिक्षकांनी आमचा दोष काय? अशी विचारणा आणि न्याय देण्याची मागणी करत सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

ठळक मुद्देन्याय देण्याची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी मांडल्या व्यथा, विविध संघटनांनी दिला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चार वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त केल्यानंतर या २७९ शिक्षकांनी आमचा दोष काय? अशी विचारणा आणि न्याय देण्याची मागणी करत सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.कार्यमुक्त शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. बीड जिल्हा परिषदेतील बिंदू नामावली सदोष असून ती तत्काळ दुरुस्त करुन सर्व अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकांना बीड जि. प. मध्येच सामावून घेण्याची मागणी यात केली आहे. महाराष्टÑात आॅनलाईन आंतरजिल्हा बदलीचे दोन टप्पे पार पडले आहेत. मोठ्या प्रमाणात बदल्या झालेल्या आहेत. त्यांच्या मूळ जागा सध्या रिक्त नाहीत, तिथेही कुठला न कुठला प्रवर्ग रिक्त आहे. बदलीमुळे आंतरजिल्हा बदली शिक्षकाची सेवाज्येष्ठता बदलीमुळे अगोदरच शून्य झालेली आहे. आणि सेवा प्रत्यावर्तित केल्याने अजून शून्य होणार आहे. शिवाय अतिरिक्त ठरल्यास पुन्हा त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होऊन न्यायालयीन प्रकरणे उद्भतील असे निवेदनात म्हटले आहे.दरम्यान जि. प. प्रशासनाच्या निर्णयाचा विविध संघटनांनी निषेध करत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला आहे. तर काही संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.२०१४ मध्ये ९२६ आंतरजिल्हा बदल्या बिंदू नामावलीप्रमाणे झाल्या. नंतर अनियमिततेचे कारण दाखवत बिंदू नामावलीप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांच्या सेवा प्रत्यावर्तित करण्याबाबत ग्राम विकास मंत्रालयाच्या अवर सचिवांनी पत्र काढले. जर ९२६ बदल्यांमध्ये अनयिमिता झाली तर त्या रद्द करुन सर्व शिक्षकांना मूळ जि. प. कडे प्रत्यावर्तित करणे आवश्यक होते. मात्र, मोजक्याच शिक्षकांवर कार्यवाही केल्याचे उपोषणार्थी शिक्षकांचे म्हणणे आहे.शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणाची पंचाईतबीड जिल्ह्यात आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना मिळवत रजू होताना त्रास झाला होता. अधिकारी व पुढाºयांचे उंबरठे झिजवावे लागले. बहुतांश शिक्षकांना पैसे मोजावे लागले, तर या शिक्षकांना वेतनासाठी जवळपास दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागली. बॅँका, पतपेढीचे कर्ज घेतले. मुलांचे शिक्षण बीड जिल्ह्यात सुरु आहे. चार-पाच वर्षांपासून सर्व सुरळीत असताना कार्यमुक्त झाल्याने या शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला आहे.शैक्षणिक वर्ष सुरु असताना व निम्मे वर्ष झालेले असताना कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणाची पंचाईत होणार आहे.कार्यमुक्त शिक्षक म्हणतात...आमचा दोष काय ?४आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक बीडमध्ये रुजू होऊन ५ वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांना नियमित पगार सुरु आहे.४सध्या जि. प. कडे १५३ जागा रिक्त आहेत. पुढील दोन वर्षात पदोन्नतीने व सेवानिवृत्तीने जवळपास ५०० ते ७०० जागा रिक्त होत आहेत. टप्प्या टप्प्याने रिक्त होणाºया जागा मुळ प्रवर्गास उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनात केली आहे.४सदोष बिंदू नामावली असताना कार्यमुक्तीची कारवाई करताना सर्व शिक्षकांना विश्वासात घेतले नाही.४प्रगटनातील व प्रसिद्धीपत्रकातील तारीख, वेळ पुरेशी नसल्याने व तफावत असल्याने ही कारवाई एकतर्फी झाली.४१९९५-९६-९७ मध्ये तयार केलेल्या बिंदू नामावलीत वंजारी, धनगर, बंजारा समाजातील शिक्षक हे खुल्या प्रवर्गातून निवड झालेले असताना २०१४, २०१५, २०१६ व २०१८ या बिंदू नामावलीत काही शिक्षकांना एनटी प्रवर्गात दाखविले आहे. यात दुरुस्ती केलेली नाही.४२०१३, २०१४ मध्ये अतिरिक्त शिक्षक होते तर २०१६ व २०१७ मध्ये दोन्ही वर्षात आॅनलाईन पद्धतीने शिक्षक बदली करुन आले ते यादीत नाहीत.४वस्तीशाळा शिक्षक शून्य बिंदूवर ठेवायचे असताना ते प्रवर्गाच्या बिंदूवर ठेवले.४सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडून शिक्षक आंतरजिल्हा बदलीने बीड जि. प. मध्ये दाखल झाले, मग यात त्यांचा दोष काय?

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकagitationआंदोलन