शाॅर्टसर्किटमुळे २५ एकवरील उसाला आग; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची झाली राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 18:23 IST2022-03-17T18:23:01+5:302022-03-17T18:23:26+5:30
तालुक्यातील खांडवी येथील सहा शेतकऱ्यांचा 20 ते 25 एकर ऊस शाॅकसर्किटने जळुन खाक झाला

शाॅर्टसर्किटमुळे २५ एकवरील उसाला आग; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची झाली राख
गेवराई (बीड) : तालुक्यातील खांडवी येथील सहा शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाला गुरुवार रोजी दुपारी अचानक शाॅटसर्किटने आग लागली यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. डोळ्या देखत तब्बल 20 ते 25 एकरवरील तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्षस्थानी गेल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख झाली आहे.
शेतकरी राहुल जैद, मंगेश जैद, बप्पासाहेब जैद, शेषेराव जैद, आशा पट्टे, भिकाजी नाईकवाडे यांचे शेत खांडवी शिवारात आहे. सर्वांनी शेतात ऊस लागवड केली आहे. आत ऊस तोडणीची वेळ होती. दरम्यान, आज दुपारी अचानक शेतामधून गेलेल्या विद्युत वाहिन्यांत शाॅटसर्किट झाला आणि ठिणगी पडली. यातून खालील उसाला आग लागली.
बघता बघता आग शेजारील शेतातील उसात पसरली. शेतकऱ्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, सहा शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा 20 ते 25 एकरवरील ऊस खाक झाला. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकणी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.