शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

बीडमध्ये २३० किलो प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:43 AM

बीड : शहरात आजही चोरट्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर केला जात आहे. पालिकेच्या विशेष पथकाने दोन दुकानांवर धाड टाकून २३० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई बीडच्या भाजीमंडईत करण्यात आली.राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदचा आदेश प्राप्त होताच बीड पालिका कारवाईसाठी ...

बीड : शहरात आजही चोरट्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर केला जात आहे. पालिकेच्या विशेष पथकाने दोन दुकानांवर धाड टाकून २३० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोमवारी दुपारी ही कारवाई बीडच्या भाजीमंडईत करण्यात आली.

राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदचा आदेश प्राप्त होताच बीड पालिका कारवाईसाठी सरसावली. मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. या पथकाने सोमवारी १७ दुकानांची तपासणी केली. यामध्ये दोन दुकानांमध्ये प्लास्टिक आढळून आले. त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच २३० किलो कॅरीबॅग व इतर प्लास्टिक जप्त करण्यात आले.९० हजारांचा दंड वसूलबीड पालिकेने आतापर्यंत १०१९ दुकानांची तपासणी केली आहे. त्यांच्याकडून ९०६ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये ८९ हजार ९०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडPlastic banप्लॅस्टिक बंदीMarathwadaमराठवाडा