बाळेवाडीत २१ जुगाऱ्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:38+5:302021-03-10T04:33:38+5:30
कडा (ता. आष्टी, जि. बीड) मोकळ्या जागेत सोमवारी रात्री काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस ...

बाळेवाडीत २१ जुगाऱ्यांना पकडले
कडा (ता. आष्टी, जि. बीड) मोकळ्या जागेत सोमवारी रात्री काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकून २१ जुगाऱ्यांना पकडले. या कारवाईत त्यांच्याकडून साहित्य, वाहने, रोकड असा ११ लाख ५३ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवारी रात्री ही कारवाई करून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील बीड नगर रोडलगत असलेल्या बाळेवाडी शिवारात मोकळ्या जागेत काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. बाळेवाडी शिवारात धाड टाकून जुगार खेळत असलेले शिवाजी गर्जे, संजय वाल्हेकर, हनुमंत बुद्धिवंत, नवनाथ रोडे, ज्ञानदेव गांगुर्डे, बाळासाहेब राळेभात,राजेंद्र शेळके, बंडू वायभासे, दिनकर नागरगोजे, गणेश दिघे, चंद्रभान लोखंडे, खंडागळे, लहू माने, सुधाकर तारू, विकास म्हस्के, सोनू औटे, राजू उमरे, सुभाष फुलमाळी, केशव उदावंत, बंडाले, शिवाजी काळे यांना ताब्यात घेतले. पोलीस शिपाई संभाजी भिल्लारे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय, प्रतिष्ठितांचा समावेश
आष्टी तालुक्यातील या धाडीत राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व प्रतिष्ठित लोक असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पुढील तपास अंभोरा पोलीस ठाण्याचे एएसआय शिवाजी नागरगोजे करीत आहेत.