बीडमध्ये बलात्कारातील आरोपीसह १९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २६५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:50 IST2020-07-15T12:50:10+5:302020-07-15T12:50:35+5:30

माजलगाव तालुक्यातील एका बलात्काराच्या गुन्ह्यातील २४ वर्षीय आरोपी पॉझिटिव्ह

19 positive with rape accused in Beed; The number of patients is 265 | बीडमध्ये बलात्कारातील आरोपीसह १९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २६५

बीडमध्ये बलात्कारातील आरोपीसह १९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २६५

बीड : माजलगाव तालुक्यातील एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीसह १९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या विस्तार अधिका-याची पत्नीही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २६५ झाली आहे.

कोरोना संशयित असलेल्या शेकडो लोकांचे स्वॅब सोमवार व मंगळवारी घेण्यात आले होते. याचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले आहेत. यात माजलगाव तालुक्यातील एका बलात्काराच्या गुन्ह्यातील २४ वर्षीय आरोपीसह १८ पॉझिटिव्ह आले आहेत. यात बीड शहरातील ७, परळीतील ६, माजलगाव १, अंबाजोगाई २, आष्टी १ व गेवराईतील दोघांचा  समावेश आहे.

आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २६५ झाली असून १२६ कोरोनामुक्त झाले आहेत. १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे.

Web Title: 19 positive with rape accused in Beed; The number of patients is 265