१७५ नवे रुग्ण, ९३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:38 IST2021-07-14T04:38:41+5:302021-07-14T04:38:41+5:30

जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ८१ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले. यात १७५ पॉझिटिव्ह ...

175 new patients, 93 coronary free | १७५ नवे रुग्ण, ९३ कोरोनामुक्त

१७५ नवे रुग्ण, ९३ कोरोनामुक्त

जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ८१ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले. यात १७५ पॉझिटिव्ह तर ३ हजार ९०६ अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात २, आष्टी २८, बीड ४६, धारुर ३, गेवराई ३६, केज १२, परळी १, पाटोदा २०, शिरुर १५ व वडवणी तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे.

तसेच २४ तासात सहा मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात डोईठाण (ता. आष्टी) येथील ७३ वर्षीय पुरुष, धारुर शहरातील ६५ वर्षीय महिला, वाणेगाव (ता. केज) येथील ५२ वर्षीय पुरुष, देवळाचीवाडी (ता. गेवराई) येथील ६० वर्षीय पुरुष, पाचेगाव (ता. गेवराई) येथील ६० वर्षीय महिला व परळी शहरातील ३० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एकूण मृत्यूचा आकडा २ हजार ५६४ झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ९३ हजार ९३७ इतकी झाली असून, यापैकी ९० हजार १३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १ हजार २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: 175 new patients, 93 coronary free