दहावीत ९६ टक्के मिळवलेल्या मुलीचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 19:11 IST2020-08-13T18:12:05+5:302020-08-13T19:11:22+5:30
अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मुलीच्या निधनाने गांवदरा गाव हळहळले

दहावीत ९६ टक्के मिळवलेल्या मुलीचा तलावात बुडून मृत्यू
धारूर : तालूक्यातील गांवदरा येथील एका १७ वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी गांवदरा येथे घडली. प्रिती दत्ताञय घुले असे मृत मुलीचे नाव आहे. सकाळी गावालगतच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. प्रीती अभ्यासात अत्यंत हुशार असल्याने तिच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गांवदरा येथील प्रिती घुले ही बारावी वर्गात होती. गुरूवारी सकाळी प्रीती गावालगतच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी पाय घसरल्याने ती तलावात पडून बुडाली. याची माहिती मिळाली असता ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेत तिला पाण्यातून बाहेर काढून धारूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. अभ्यासात हुशार असलेल्या प्रीतीला दहावीत 96 % गुण होते. यावर्षी ती बारावीत होती. मृत्यूनंतर नेञदानाचा तिने संकल्प केल्याची माहिती आहे. मुख्याध्यापक ए. आर. तिडके तसेच ग्रामस्थांनी गावाचे नाव गाजवणारी मुलगी मृत झाल्याच्या भावना माडंत हळहळ व्यक्त केली आहे.