शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

खोटारडे गुरुजी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:18 IST

जिल्हा परिषदेतील १६ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी निलंबित केले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हांतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी, चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी अंतिम सुनावणी अखेर जिल्हा परिषदेतील १६ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी निलंबित केले आहे. बदल्यांसाठी ठकबाजी करणाऱ्या गुरुजींना निलंबनाचा ‘रट्टा’ बसला. बीड जिल्हा परिषदेतील हा निर्णय धाडसी मानला जात असून, अशी कारवाई राज्यात प्रथमच झाली असावी.जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या मे, जूनमध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत बदल्यांमध्ये पात्र असताना शिक्षकांवर अन्याय झाल्याने चुकीची माहिती सादर करुन बदलीचा लाभ घेणाºया शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विविध शिक्षक संघटना व शिक्षकांनी केली होती. या संदर्भात राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाकडे तक्रारीनंतर आॅनलाईन अर्जात चुकीची माहिती भरणाºया शिक्षकांना पाठीशी न घालता कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती भरणाºया ४१५ शिक्षकांच्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यांची सुनावणी विविध टप्प्यात झाली. गटशिक्षणाधिकाºयांकडून अहवाल मागविण्यात आले होते. यात १८ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संवर्ग-१ आणि २ मध्ये बहुतांश शिक्षकांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती भरली, त्यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाल्याने त्यांनी तक्रारी केल्या होत्या. निलंबित केलेल्या १६ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखली जाणार आहे. तसेच नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई होत आहे.मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ३२ सहशिक्षकांच्या सुनावण्या घेतल्या होत्या, त्यांचे खुलासे प्राप्त झाले होते तर अंतराबाबत तक्रार असल्याची पडताळणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी केली. इतर उर्वरित प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंतराचा अहवाल अद्याप अप्राप्त असल्याने येत्या काही दिवसांत खोटी माहिती आढळणाºया संबंधित शिक्षकांवर देखील कारवाईची शक्यता आहे. यापुढे चुकीची माहिती दर्शवून लाभ घेतल्यास अशीच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड यांनी सांगितले.निलंबनाची ही कारणेपती-पत्नी एकत्रिकरणात ३० किलोमीटरपेक्षा कमी अंतर असताना जास्त अंतर दाखवणारे ४ तसेच पती-पत्नीच्या आस्थापनेपासून ३० कि.मी. च्या आतील शाळा न मागता जास्त अंतराची शाळा मागणाºया २ शिक्षकांचा समावेश आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये सेवेत आलेला नियुक्ती दिनांक न दाखवता संस्था किंवा इतर जि.प.मधील दाखविणाºया ६ शिक्षकांचा समावेश आहे.अंतरजिल्हा बदलीचा जुना आॅनलाईन अर्ज डिलीट न करता दुसºयांदा बदलीचा लाभ घेणारा तसेच पती सामाजिक संस्थेत कंत्राटी, पत्नी डाटा एन्ट्री आॅपरेटर असे दाखविण्यात आले होते. मात्र पती नमूद पदस्थापनेवर कार्यरत नसताना कार्यरत असल्याचे दाखविले, असे ४ शिक्षक आहेत. एका सहशिक्षिकेने दाखविलेले अंतर बरोबर होते, त्यांचा तसेच मेंदूविकार असणारा व परित्यक्ता महिला सहशिक्षिकेचा खुलासा मान्य करण्यात आला. तीन प्रकरणात अपंग पडताळणी आणि चार प्रकरणात शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकsuspensionनिलंबन