१४४ गावांना मिळणार सामाजिक सभागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:48 IST2018-09-21T00:46:12+5:302018-09-21T00:48:59+5:30
परळी मतदारसंघातील १४४ गावांमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बीड जिल्हा परिषदेने नुकतीच या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, लवकरच सभागृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.

१४४ गावांना मिळणार सामाजिक सभागृह
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : परळी मतदारसंघातील १४४ गावांमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बीड जिल्हा परिषदेने नुकतीच या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, लवकरच सभागृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागाच्या २५१५ कोटी रुपयांच्या निधीतून ग्रामीण भागातील जनतेची गरज ओळखून हा निधी मंजूर केला. प्रत्येक गावांत सामाजिक सभागृह बांधण्याचा शब्द दिला होता. या शब्दांची पूर्ती करण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील १४४ गावांना ग्रामविकास विभागाच्या मूलभूत विकास योजनेमधून हा निधी मंजूर केला आहे.
परळी तालुक्यातील ८६ गावांना ९ कोटी २० लाख तर मतदारसंघात येणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील ५८ गावांना ५ कोटी ८० लाख असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी त्यांनी दिला आहे.
भेदभाव न करता समतोल विकासाचे धोरण
पक्षीय भेदभाव न करता मतदारसंघातील प्रत्येक गांवचा समतोल विकास करण्यात येईल, असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी गावांना मंजूर केला, असून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावोगावी अनेक कामे सध्या सुरू आहेत. ग्रामीण भागात सामाजिक सभागृहाची गरज होती आणि हीच गरज ओळखून त्यांनी हा निधी उपलब्ध दिला आहे.