झोपडीत १४ वर्षीय मुलगी मृतावस्थेत आढळ्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 17:30 IST2022-03-29T17:23:03+5:302022-03-29T17:30:26+5:30
घात की अपघात याबाबत पोलीस कसून तपास करत आएह्त.

झोपडीत १४ वर्षीय मुलगी मृतावस्थेत आढळ्याने खळबळ
गेवराई (बीड) : तालुक्यातील देवकी येथील गायरानावरील वस्तीवर एक १४ वर्षीय मुलगी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयुरी नवनाथ चव्हाण असे मृत मुलीचे नाव आहे. आज सकाळी झोपेतून मयुरी जागी झाली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घात की अपघात याबाबत पोलीस कसून तपास करत आएह्त.
मयुरी नवनाथ चव्हाण देवकी येथील गायरान वस्तीवर राहते. सोमवारी रात्री मयुरी आपल्या आत्यासोबत झोपली होती. मात्र, आज सकाळी ती झोपलेल्या ठिकाणीच मृत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार, सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्यासह अशोक शेळके, विठ्ठल देशमुख, अमोल खटाने, शेखर हिंगावार, कडाजी मदने यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृत मयुरीच्या शरीरावर कुठलीही जखम आढळून आली नाही. शवविच्छेदनानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे हे करित आहेत.