शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

‘स्वच्छता दर्पण’साठी जिल्ह्यातील १३६४ गावे सज्ज; राष्ट्रीय स्तरावर गुणांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:57 PM

‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी १३६४ गावे सज्ज झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी १३६४ गावे सज्ज झाली आहेत. गावातील सर्व कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छग्रहींच्या मदतीने जनजागृती, स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण व घनकचरा सांडपाण्याचे व्यवस्थापन करणेहे उपक्र म प्रामुख्याने तपासण्यात येणार असून शाश्वत स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून जनजागृती करण्यावर जिल्ह्याचे गुणांकन होणार आहे.राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता दर्पण ही गुणांकन स्पर्धा असून ३० जुलैपर्यंत सर्वांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, शौचालयाचा वापर शाश्वत स्वच्छतेसाठी स्वच्छाग्रही यांची निवड प्रशिक्षण व स्वच्छाग्रह सक्रिय करणे या बाबी या स्पर्धेसाठी महत्त्वाच्या असून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबबत गावात जनजागृती करण्यासाठी रंगरंगोटी करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे.‘हागणदारी मुक्त गावात आपले स्वागत’ अशा आशयाचे स्वागत फलक व लहान मुलांच्या शौचाचे व्यवस्थापन, शौचालयाचा वापर, शौचालय सर्वांसाठी तसेच घनकचरा व्यवस्थापन हे ४ महत्वाचे चित्रसंदेश गावात रंगवणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने दिलेला नमुना आकार रंगसंगती प्रमाणे एक स्वागत फलक व चार भिंती रंगवावे. आॅफ अ‍ॅपच्या मदतीने फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. या आधारेच गुणांकन करण्यात येणार आहे. यासाठी २० गुण आहेत. कामासाठी व स्वागत फलक तयार करण्यासाठी १३६४ गावांना निधी उपलब्ध करु न दिला जात आहे.ग्रामसेवक व सरपंच तसेच गावातील पाच महिलांच्या स्वाक्षरीने रंग कामाचा अहवाल पंचायत समितीस दाखल होताच संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर रंगकामाचा निधी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी जिओ टॅगींग महत्वाची आहे. रंग काम पूर्ण करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर फोटो अपलोड करावयाचा आहे. ग्रामसेवक, सरपंच व देखरेख समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन आपले गाव व ग्रामपंचायत राष्ट्रीय स्तरावर गुणांकनात अव्वल आणण्यासाठी प्रयत्न करावेत.स्वच्छता दर्पण या स्पर्धेचा कालावधी ३० जुलैपर्यंतचा आहे त्यामुळे गावनिहाय कोणत्या बाबी गुणांकन करण्यास साहाय्यभूत होणार आहेत याचा विचार करून काम पूर्ण करून घ्यावे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी केले आहे.जिल्हयातील सहभागी गावेबीड - २२९, अंबाजोगाई - १०६, गेवराई - २००, माजलगाव - १२६, धारुर - ६७, केज - १२२, पाटोदा - ९७, परळी - १०७, शिरुर - ९१, वडवणी - ४४, आष्टी - १७५

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWaterपाणीcivic issueनागरी समस्या