बॅँक अधिकाऱ्यांच्या संपामुळे १२०० कोटींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:46 IST2018-12-22T00:45:48+5:302018-12-22T00:46:25+5:30
अखिल भारतीय बॅँक अधिकारी महासंघाच्या वतीने प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बॅँकांचेअधिकारी सहभागी झाल्याने सुमारे १२०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. सकाळी येथील एसबीआयच्या मुख्य शाखेसमोर बॅँक अधिकाºयांनी निदर्शने करत आपल्या मागण्या मांडल्या.

बॅँक अधिकाऱ्यांच्या संपामुळे १२०० कोटींचे व्यवहार ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अखिल भारतीय बॅँक अधिकारी महासंघाच्या वतीने प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बॅँकांचेअधिकारी सहभागी झाल्याने सुमारे १२०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. सकाळी येथील एसबीआयच्या मुख्य शाखेसमोर बॅँक अधिकाºयांनी निदर्शने करत आपल्या मागण्या मांडल्या.
प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी, वेतनश्रेणींची पुनर्रचना, काम आणि जीवनाचा ताळमेळ बसवावा, ५ दिवसांचा आठवडा, कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत अद्ययावत सुधारणांसह निर्णय घ्यावा, अनुत्पादीक बाबींवरील थकित कर्ज वसुली, जुनी पेन्श्न तसेच इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय अधिकारी महासंघाच्या वतीने २१ डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला होता.
या संपात जिल्ह्यातील विविध बारा राष्टÑीयकृत बॅँकांमधील १६० अधिकाºयांनी सहभाग नोंदविला. अधिकारी संपावर गेल्याने बॅँकांतील कामकाज अशक्य असल्याने बॅँक काउन्टर बंद होते. त्यामुळे गुरुवारी बॅँकांचे व्यवहार ठप्प झाले होते.
सकाळी जालना रोडवरील एसबीआयच्या मुख्य शाखेसमोर बॅँक अधिकाºयांनी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात आॅफीसर संघटनेचे एसबीआयचे विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बॅँक आॅफ इंडियाचे कृष्ण मुरारी, युनियन बॅँकेचे सैनी, युको बॅँकेचे सुधीरकुमार, सिंडीकेट बॅँकेचे संदीपकुमार तसेच दिनेश भगुरकर, महेंद्र वाघमारे, धनंजय कार्लेकर, अलोककुमार जैस्वाल, विकास केदार, सुधीर टेंभुर्णे, अमोल गायके, प्रवीण गरुड, मल्हार हाके, गुणवंत मदने, हनुमंत ठोंबरे, सचिन पवार, मारू, नारायण गरंडवाल यांच्यासह विविध बॅँकांचे अधिकारी सहभागी होते.