शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

बीड जिल्ह्यात पाणवठ्यावर १२ हजार ७७४ वन्यप्राणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:25 IST

बुध्द पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन विभाग व अन्य प्राणी संघटनेच्या मदतीने वन्यप्राण्यांचे सनियंत्रण व प्रगणना करण्याचे काम ट्रॅप कॅमऱ्याच्या माध्यमातून केले गेले. त्या आधारे मिळालेल्या आकडेवारीनुसार नायगांव अभयारण्य व अन्य ठिकाणी तब्बल १२ हजार ७७४ प्राणी असल्याचे निष्पन्न झाले.

ठळक मुद्देकडकडीत दुष्काळातही वन्यजीवांची आकडेवारी समाधानकारक

विजयकुमार गाडेकर।शिरूर कासार : बुध्द पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन विभाग व अन्य प्राणी संघटनेच्या मदतीने वन्यप्राण्यांचे सनियंत्रण व प्रगणना करण्याचे काम ट्रॅप कॅमऱ्याच्या माध्यमातून केले गेले. त्या आधारे मिळालेल्या आकडेवारीनुसार नायगांव अभयारण्य व अन्य ठिकाणी तब्बल १२ हजार ७७४ प्राणी असल्याचे निष्पन्न झाले.वनपरिक्षेत्रात सध्या दुष्काळाचा प्रादुर्भाव वाढलेला असून, चारा पाण्याचे दुर्भिक्ष्य असले तरी वनविभाग व प्राणीमित्र संघटनेच्या सहकार्याने आवश्यक त्या ठिकाणी पाणवठे व त्यात पाणी टाकल्याने वन्यप्राण्याला दुष्काळाची झळ तेवढीशी जाणवली नसल्याचे आकडेवारीवरून समजून येते. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्रामुख्याने प्रत्येक वर्षी हा उपक्र म राबवला जातो. त्यातून जिल्यातील वन्यप्राण्यांची आकडेवारी जाणून घेतली जाते. त्यानुसार आवश्यक त्या गरजा पूर्ण करणे सोपे होते. शनिवारी वनविभाग व वन्यजीव पुनर्वसन व संवर्धन या सिद्धार्थ सोनावणे यांच्या संस्थेबरोबरच अन्य प्राणीमित्रांनी या प्रगणन कामात सहभाग घेतला होता. विविध ठिकाणच्या पाणस्थळावरील आकडेवारीचे संकलन केले असता विविध जातीचे वन्यप्राणी तब्बल १२ हजार ७७४ आढळून आले. या वन्यजीवांची तहानभूक भागविण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाल्यास यात आणखी वाढ होऊ शकते.मोर निम्मे, लांडोर दुप्पटनायगांव अभयारण्यात निरगुडी, पिंपळगाव (धस),डोंगरिकन्ही या नियत क्षेत्रात पाणस्थळावर १० हजार १२१ वन्यप्राणी आढळून आले. त्यात मोर (नर) २ हजार २५२, तर लांडोर (मादीचा आकडा) ५ हजार ९५१ एवढा तयार झाला.त्याशिवाय कोल्हा, ससा, ऊद, खोकड, रानडुक्कर, मूंगूस, सायाळ, लांडगा, चिंकारा, तरस, रानमांजर, काळवीट व नीलगाय असा एकूण आकडा १० हजार १२१ इतका झाला.नायगांव अभयारण्य परिक्षेत्राच्या बाहेर देखील असणाºया पाणस्थळावर कॅमेºयाच्या माध्यमातून ही प्रगणना करण्यात आली.यात २ हजार ६५३ इतके वन्यप्राणी आढळून आले. नायगांव अभयारण्य परिक्षेत्राबाहेर देखील मोरांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.७३ पाणवठे, २६ ट्रॅप कॅमेरेविभागीय वनाधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास गीते, अशोक काकडे, रंगनाथ शिंदे वनअधिकारी सायमा पठाण यांच्या सह वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे, सर्पराज्ञी संचालिका सृष्टी सोनवणे, रविना सवाई, वैशाली गायकवाड, विनय इंगळे, वनपाल अजय देवगुडे, दिगंबर फुंदे, विजय केदार, राजू नांदुरे, एस. पी. शेळके, शोभा आघाव, शिवाजी आघाव, गोकुळ आघाव, अनिल आघाव आदी वनपाल, वनरक्षक, वनमजुरांनी या प्रगणना कार्यात सहभाग घेतला.वन परिक्षेत्राबाहेरही वन्यजीवांचा वावरपरिक्षेत्रा बाहेर ८८१ मोर, पाठोपाठ ७४१ रानडुकर, काळवीट ४२३, चिंकारा २५२, सायाळ ६६ , कोल्हे ६३, खोकड २८, ससे ९२, मुंगुस १५, लांडगे २५, नीलगाय ३२, खार २४ तर रानमांजर, तडस, घोरपड प्रत्येकी २ मिळून आले. जिल्हाभरात सर्प गरुडाचा आकडा अवघ्या पाचवर स्थिरावला.

टॅग्स :Beedबीडforest departmentवनविभाग