शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणास १०० दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला कधी पकडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:43 IST

पोलिसांसह सीआयडीचे अपयश उघड

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. घटनेला १०० दिवस उलटूनही आरोपी अटक नसल्याने पोलिसांसह सीआयडीचे अपयश उघड झाले आहे. त्याच्या अटकेबाबत केवळ शोध सुरू असल्याचे सांगून माध्यमांना बोलणे टाळले जात आहे.

९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड, त्याचा मावस भाऊ विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ जण आरोपी होते. सीआयडीने तपास करून ८० दिवसांत १ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर यात जोडलेले देशमुखांना मारहाण करणारे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला होता. याच प्रकरणातील आठवा आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही सीआयडीला सापडलेला नाही. त्याच्या अटकेची मागणी देशमुख कुटुंबासह अनेकांनी केली.

धनंजय मुंडेंचा राजीनामाया प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याचा सहभाग आढळला. त्यानंतर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी मुंडे यांच्यावर टीका करण्यासह राजीनामा देण्याची मागणी केली होती; परंतु तरीही राजीनामा झाला नव्हता. अखेर देशमुख यांना मारहाणीचे काही फोटो व्हायरल झाले आणि त्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले. मग मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला होता.

बीडच्या न्यायालयात चालणार खटलाबीडच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असले तरी हा खटला केज न्यायालयात चालवला जात होता; परंतु सीआयडीने आरोपींची सुरक्षा आणि ने-आणचे कारण देत बीडमध्येच हा खटला चालवावा, असा अर्ज केला होता. त्याला बुधवारी मान्यता मिळाली. त्यामुळे हा खटला बीडमध्ये चालणार असून २६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

उज्ज्वल निकम येणार का?या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली होती; परंतु अद्यापही ते बीडमध्ये आलेले नाहीत. आता २६ मार्च रोजी ते बीडला येतील, अशी शक्यता सहायक सरकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण