सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा वाहनाच्या धडकेने मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 17:21 IST2021-07-29T17:21:24+5:302021-07-29T17:21:43+5:30

खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गावंदरा येथील काही तरुण सैन्य आणि पोलीस भरतीच्या सरावासाठी जातात.  

A young man preparing for army recruitment was killed in a road accident | सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा वाहनाच्या धडकेने मृत्यू 

सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा वाहनाच्या धडकेने मृत्यू 

किल्लेधारूर  (बीड) : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणास भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी तालूक्यातील गांवदरा- आंबेवडगाव येथे घडली. उमेश परमेश्वर घुले ( 18 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गावंदरा येथील काही तरुण सैन्य आणि पोलीस भरतीच्या सरावासाठी जातात.  आज सकाळी गावंदरा ते आंबेवडगाव या मार्गावर उमेश परमेश्वर घुले यास सराव करताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात उमेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, तरुणास चिरडून तिथून पळ काढला आहे
 

Web Title: A young man preparing for army recruitment was killed in a road accident