मेकअप करण्याआधी 'हा' नियम फॉलो कराल तर चेहरा दिसेल उठून!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 13:30 IST2019-10-14T13:22:38+5:302019-10-14T13:30:31+5:30
प्रत्येक महिला आजकाल मेकअप करतात. पण मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे अनेकांना माहीत नसतं.

मेकअप करण्याआधी 'हा' नियम फॉलो कराल तर चेहरा दिसेल उठून!
(Image Credit : bebeautiful.in)
प्रत्येक महिला आजकाल मेकअप करतात. पण मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे अनेकांना माहीत नसतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर मेकअप करता तेव्हा चेहरा उतरलेला आणि त्वचा कोरडी दिसू लागते. ही समस्या होऊ नये यासाठी काही मेकअपचे काही नियम फॉलो करणं गरजेचं आहे. याने तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक सौंदर्य दिसेल. यातीलच एक नियम म्हणजे मेकअप बेस लावणे. चला जाणून घेऊ याचं महत्व..
चेहऱ्यावर मेकअपची सुरूवात सीरमने करायला हवी. कारण जेव्हा तुम्ही त्वचेवर सीरम लावता तेव्हा हे त्वचेच्या आत जाऊन त्वचा मॉइश्चर होते आणि हायड्रेटही दिसू लागते. तसेच मेकअप चेहऱ्यावर थापल्यासारखा दिसणार नाही.
प्रायमर किंवा बेस
प्रायमर किंवा मेकअफच्या बेसचा वापर सीरम लावल्यानंतर केला पाहिजे. पण कधीही प्रायमर पूर्ण चेहऱ्यावर लावायचं नसतं. जेव्हा तुम्ही मेकअपची सुरूवात कराल तेव्हा जिथे पोर्स म्हणजेच रोमछिद्रे जास्त मोकळी दिसतात तिथेच लावा. तसेच प्रायमर हे क्रीमसारखं हातावर घेऊन नाही तर बोटांनी पोर्सवर लावा.
प्रायमर लावण्याचे फायदे
जर चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणि मुलायमपणा आणायचा असेल तर प्रायमर नक्की लावा. सोबतच प्रायमर लावल्याने चेहऱ्याची त्वचा एकसारखी दिसू लागते आणि पुढील मेकअपसाठी एक चांगला बेस तयार होतो. प्रायमर लावल्याने सुरकुत्याही झाकल्या जाता आणि एक शानदार फ्रेश लूक तुम्हाला मिळतो.
जर तुम्ही असा विचार करत असाल की, प्रायमर लावल्याने चेहऱ्यावर मास्कसारखं दिसेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण हे लावल्यानंतर तुम्हाला जाणवेल की, त्वचा किती मुलायम आणि लाइट दिसत आहे. सोबतच प्रायमरची सर्वात खास बाब ही आहे की, कन्सीलर आणि फाउंडेशनप्रमाणेच प्रत्येक स्किन टोननुसार वेगवेगळ्या टोनमध्ये येत नाही. सगळ्यांसाठी एकच प्रकारचं येतं. त्यामुळे इतर ब्युटी प्रॉडक्टपेक्षा हे वेगळं ठरतं.
(टिप : वरील उपाय हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. याचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. कारण हे प्रत्येकालाच सूट होईल असं नाही. काहींना याचे साइड इफेक्टही होऊ शकतात.)