जगातील सर्वात महागडी सेलिब्रिटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 14:28 IST
अमेरिकेतील व्यापार संबंधी माहिती देणारी पत्रिका ‘फोर्ब्स’ तर्फे जाहीर करण्यात आलेल्या सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत गायिका टेलर स्विफ्ट सर्वात पहिल्या स्थानावर आहे.
जगातील सर्वात महागडी सेलिब्रिटी
अमेरिकेतील व्यापार संबंधी माहिती देणारी पत्रिका ‘फोर्ब्स’ तर्फे जाहीर करण्यात आलेल्या सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत गायिका टेलर स्विफ्ट सर्वात पहिल्या स्थानावर आहे. वेबसाइटच्या रिपोर्ट नुसार, पत्रिकामध्ये वार्षिक ‘सेलिब्रिटी १००’ ची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यात २६ वर्षीय गायिका प्रथम क्रमाकांवर आहे. स्विफ्टने जून २०१५ पासून २०१६ पर्यंत १७ करोड डॉलरची कमाई केली.‘एप्पल’, ‘डायट कोक’ आणि ‘केड्स’ सोबत झालेल्या करारातूनही गायिका पैसे कमविते आहे. या अगोदर गेल्या वर्षीच्या यादीत स्विफ्ट आठव्या क्रमांकावर होती.