बदलत्या वातावरणात स्किनची काळजी घेण्यासाठी वापरा व्हिटॅमिन-सी पॅक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 16:27 IST2018-10-15T16:26:17+5:302018-10-15T16:27:41+5:30
लवकरच हिवाळा सुरू होणार आहे. या बदलणाऱ्या ऋतूंचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होणार आहे. खोकला, ताप यांसारख्या आजारांनी अगदी नकोस होतं. वातावरणातील बदलांचा फक्त आरोग्यावर नाही तर स्किनवरही प्रभाव होतो.

बदलत्या वातावरणात स्किनची काळजी घेण्यासाठी वापरा व्हिटॅमिन-सी पॅक!
लवकरच हिवाळा सुरू होणार आहे. या बदलणाऱ्या ऋतूंचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होणार आहे. खोकला, ताप यांसारख्या आजारांनी अगदी नकोस होतं. वातावरणातील बदलांचा फक्त आरोग्यावर नाही तर स्किनवरही प्रभाव होतो. परंतु, यावेळी तुमची स्किन हेल्दी आणि चमकदार होण्यास मदत होते. त्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन-सी वापरू शकता.
व्हिटॅमिन-सी चे स्किनला होणारे फायदे -
- त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते
- त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी फायदेशीर
- त्वचा मुलायम होते
- स्किन इन्फेक्शन दूर होते
- त्वचेवरील डाग, डार्क सर्कल्स लाइट होतात
- व्हिटॅमिन-सीमध्ये अॅन्टी-एजिंग तत्व असतात
जाणून घेऊयात व्हिटॅमिन-सी असलेल्या 3 पदार्थांबाबत, ज्यांचा घरगुती फेस पॅक तयार करण्यासाठी वापर करू शकता.
1. संत्र्याची साल
संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं. संत्र्याची साल उन्हामध्ये सुकवून त्याची पावडर तयार करा. फेस पॅक तयार करण्यासाठी दूधाचा किंवा दह्याचा वापर करा. जर तुमची स्किन ड्राय असेल तर दह्यामध्ये संत्र्याची पावडर मिक्स करून चेहरा, मान आणि हातांवर लावा. त्यामुळे स्किन स्वच्छ होईल आणि डाग नाहीसे होतील. तसेच त्वचेवर ग्लो येण्यास मदत होईल.
2. टॉमेटोचे फेस पॅक्स
टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतात. टॉमेटोच्या गरामध्ये काकडीचा रस, मध एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. सुकल्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवून घ्या. आठवड्यामध्ये 3 वेळा फेस पॅक लावल्याने त्वचा उजळण्यास मदत होईल.
3. लिंबू
लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. लिंबाच्या रसाचे काही थेंब दह्यामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावा. टॉमेटोच्या रसामध्येही लिंबाचा रस मिक्स करून तुम्ही लावू शकता. त्याचप्रमाणे हळद, मुलतानी माती, चंदन यांपासून फेस पॅक तयार करण्यासाठी त्यामध्ये लिंबाचे थेंब मिक्स करा. लिंबामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.