​थकवा घालवायला डॉक्टर कशाला हवा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 08:52 IST2016-03-15T15:52:54+5:302016-03-15T08:52:54+5:30

जास्त काम केल्याने अनेक वेळा आपल्याला थकवा येतो.  हा थकवा घालविण्याचे विविध उपाय  आहेत. 

Why do doctors want to wear tiredness? | ​थकवा घालवायला डॉक्टर कशाला हवा ?

​थकवा घालवायला डॉक्टर कशाला हवा ?

याकरिता कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरी ते आपल्याला करता येऊ शकतात. त्याचे आपण नियमीत सेवन केले तर  थकवा हा हमखास दूर होतो. त्यामुळे दिवसभरही कामात उत्साह जाणवतो. थकवा दूर होणारी ही काही  पथ्थे खालीलप्रमाणे ...
 केळी : केळीमध्ये योग्य प्रमाणात पोट्रेशियम असते. नियमीत सेवन केले तर त्यापासून शरीराला एनर्जी मिळते. व त्यामुळे कधीही थकवा जाणवत नाही. डॉक्टरही नेहमी केळी खाण्याचा सल्ला देतात.
ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिफिनोल राहतात. त्यामुळे शरीरातील तणाव व थकवा दूर होतो. त्यामुळे नेहमी चेहºयावर उत्साह असल्याचे जाणवते. ही टी दिवसातून २ ते ३ वेळा घेणे आवश्यक आहे. 

दही: थकवा लवकर घालविण्यासाठी दही हे सुद्धा फार उपयुक्त आहे. त्यामुळे आळसही कमी झाल्याशिवाय राहीत नाही. दुपारच्या जेवणामध्ये दह्याचे सेवन करावे. 

पालक : आरोग्यासाठी भाजीपाला सेवन हे सर्वात उत्तम आहे. त्याकरिता थकवा घालविण्यासाठी इतर सर्व भाज्यांमधून पालक हे उपयुक्त आहे. दररोजच्या जेवणामध्ये आपण पालकाचा समावेश करावा. त्याच्यामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात  असते. त्यामुळे आपले रक्तही वाढू शकते. व थकवा हा आपोआप दूर होतो. 

Web Title: Why do doctors want to wear tiredness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.