तांदळाच्या पिठाने उजळेल त्वचा अन् पिंपल्स होतील दूर; असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:46 PM2019-10-21T12:46:29+5:302019-10-21T12:52:51+5:30

उन्हापासून बचाव करण्याची गरज फक्त उन्हाळ्यातच नाहीतर हिवाळ्यातही असते. हिवाळ्यातील उन्हापासून त्वचेचा बचाव करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक महिला थंडीमध्ये सनस्क्रिन लोशन लावणं टाळतात.

Whiten your skin with rice flour in winter | तांदळाच्या पिठाने उजळेल त्वचा अन् पिंपल्स होतील दूर; असा करा वापर

तांदळाच्या पिठाने उजळेल त्वचा अन् पिंपल्स होतील दूर; असा करा वापर

googlenewsNext

उन्हापासून बचाव करण्याची गरज फक्त उन्हाळ्यातच नाहीतर हिवाळ्यातही असते. हिवाळ्यातील उन्हापासून त्वचेचा बचाव करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक महिला थंडीमध्ये सनस्क्रिन लोशन लावणं टाळतात. थंडीमध्ये त्वचेचा रंग उन्हाळ्याच्या तुलनेत अधिक काळवंडतो. तसं पाहायला गेलं तर ज्या महिलांना सतत उन्हामध्ये राहावं लागतं त्यांना त्वचेच्या विविध समस्यांचा सामना जास्त करावा लागतो. 

अशातच आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पीठापासून तयार होणाऱ्या एका फेसपॅकबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याची त्वचा काळी पडण्यापासून बचाव करू शकता. तांदळाच्या पिठामध्ये PABA नावाचं तत्व आढळून येतं. जे चेहऱ्यावर नैसर्गिक सनस्क्रिनप्रमाणे काम करतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर एजिंगचे इफेक्टही कमी करतं. तांदळाच्या पीठामध्ये तेल Observing तत्व असतात. जे आपल्या त्वचेला फ्रेश लूक देण्याचं काम करतात. 

जाणून घेऊया तांदळाच्या पिठाचा फेसफॅक तयार करण्याची पद्धत आणि कृती : 

फेसपॅक लावण्याआधी चेहरा डीप क्लीन करणं अत्यंत गरजेचं असतं. अशातच सर्वात आधी पाणी किंवा टोनरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर 2 चमचे तांदळाच्या पिठामध्ये कच्चं दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्टच्या मदतीने चेहऱ्यावर 5 मिनिटांपर्यंत स्क्रब करा. चेहऱ्यासोबतच मानेवरही स्क्रब करू शकता. 

त्यानंतर एका बाउलमध्ये, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, एक चमचा रोज वॉटर आणि एक चमचा मध एकत्र करून फेसपॅख तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून फेसपॅक काढून टाका. चेहऱ्यासोबतच मानेवरही अप्लाय करू शकता. 

तांदळाचं पीठ आणि दही 

तांदळामध्ये अमिनो अॅसिड आणि व्हिटॅमिन्स असतात. जे स्किनसाठी एखाद्या व्हाइटनिंग एजंटप्रमाणे काम करतात. तसेच त्यावर जमा असलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. तांदळाच्या पिठामध्ये 3 चमचे दही आणि एक चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. फेसपॅक सुकल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. काही दिवसांमध्येच तुम्हाला चेहऱ्यामध्ये बदल दिसून येतील. 

तांदळाच्या पिठाची फेस पावडर 

तांदळाचं पिठ तुम्ही फेस पावडर म्हणून वापरू शकता. यामध्ये असलेलं तत्व चेहऱ्यावरील एक्स्ट्रा ऑइल शोषून घेतं. त्यामुळे त्वचा तेलकट दिसत नाही. अनेक महिलांना फेस पावडर लावल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तांदळाच्या पिठाची पावडर चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्सची समस्या उद्भवत नाही. 

इतर फायदे... 

तांदळाचं पीठ चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठीही मदत करतात. हे त्वचेसाठी एखाद्या उत्तम एक्सफोलिएटर प्रमाणे काम करतं आणि मृत पेशी काढून टाकण्यासाठीही मदत करतात. त्यामुळे तुमची त्वचेला फ्रेश दिसण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Whiten your skin with rice flour in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.