यशस्वी लोक दुपारी काय करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2016 11:15 IST2016-01-16T01:08:59+5:302016-01-31T11:15:22+5:30

दुपारची वेळ सर्वांनाचा फार नीरस वाटते. सकाळचा उत्साह, ऊर्जा दुपारी निवळून जाते. त्यामुळे दुपारी काम...

What do successful people do in the afternoon? | यशस्वी लोक दुपारी काय करतात?

यशस्वी लोक दुपारी काय करतात?

पारची वेळ सर्वांनाचा फार नीरस वाटते. सकाळचा उत्साह, ऊर्जा दुपारी निवळून जाते. त्यामुळे दुपारी काम करण्याची इच्छाच नाही राहत. आदल्या रात्री पुरेशी झोप नाही झाली तर दुपार खराब होणारच. आपल्यास आहाराचासुद्धा त्यावर परिणाम असतो. कॉम्प्युटरसमोर जास्त काळ बैठे काम केल्यामुळेसुद्धा दुपारी थकवा जाणवतो. मग दुपारी येणारा कंटाळा घालवायचा तरी कसा? याचे उत्तर यशस्वी लोक दुपारी काय करतात यातून मिळते.
१. मिटिंग
दुपारचा वेळ काही केल्या जात नाही. अशावेळी अगोदरच दिवसभराच्या कार्यक्रमाची आखणी करून यशस्वी लोक दुपारच्या वेळी मिटिंग ठेवतात. त्यामुळे ऑफिस कामातून ब्रेकही मिळतो आणि मिटिंगसाठी बाहेर गेल्यामुळे मनदेखील प्रसन्न होते.
२. कॉफी
दुपारी जर झोप येत असेल तर कॉफी प्यावी. अनेक तज्ज्ञसुद्धा मानतात की जर प्रमाणात कॉफीचे सेवन केले तर आपल्या ऊज्रेची पातळी वाढते. पण जास्त कॉफी पिणे घातकही ठरू शकते. तुम्ही जर कॉफी पीत नसाल तर चहा किंवा ग्रीन टी त्याला पर्याय आहे.
३. वामकुक्षी
दुपारची झोप तसे पाहिले तर शरीरासाठी चांगली नसते. मात्र थोड्यावेळासाठी शांतपणे डोळे मिटून पडण्यास काहीच हरकत नाही. दुपारी पॉवर नॅप घेण्याची अनेक यशस्वी लोकांना सवय असते. थॉमस एडिसन तर म्हणायचा, दुपारी पॉवर नॅपमध्ये मला नवीन कल्पना सूचत असते.
४. गाणी ऐकणे
दुपारचा कंटाळा, थकवा दूर करण्यासाठी संगीतासारखा दुसरा उपाय नाही. मूड फ्रेश करणारे गाणे ऐकले तर अंगामध्ये ऊज्रेचा संचार होतो. त्याबरोबरच आपल्या डोक्यातील विचार स्पष्ट होण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो.
५. हलका व्यायाम
आजकाल बैठे काम जास्त झाल्यामुळे आपल्या शरीराची हवी तितकी हालचाल होत नाही. त्यामुळे दुपारच्या वेळी थोडावेळ पायी फिरणे, हलका व्यायाम करणे फायद्याचे आहे. आरोग्याबरोबरच आपला मूडसुद्धा ठिक होतो. त्यामुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते.

Web Title: What do successful people do in the afternoon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.