वजन कमी करणारा फुगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:42 IST2016-01-16T01:14:54+5:302016-02-07T12:42:14+5:30

ओबेसिटी, लठ्ठपणा, वाढते वजन ही फार मोठी समस्या आहे. अतिवजनामुळे अनेक रोगांना बळी पडावे लागते.

Weight loss balloon | वजन कमी करणारा फुगा

वजन कमी करणारा फुगा

ेसिटी, लठ्ठपणा, वाढते वजन ही फार मोठी समस्या आहे. अतिवजनामुळे अनेक रोगांना बळी पडावे लागते. त्यामुळे झटपट वजन कमी करण्यासाठी लोक नाना प्रकारचे हतखंडे वापरताना दिसतात.

वेटलॉस व्यायाम, सर्जरी, फिटनेस प्रोग्राम, गोळ्या-औषधी अशा सगळ्याच मार्गांचा अवलंब केला जातो. परंतु यावर आता जरा वेगळाच उपाय पॉप्यूलर होत आहे. यामध्ये पोटामध्ये एक फुगा सोडण्यात येतो, ज्या कारणाने पोट भरल्यासारखे वाटते व भूक कमी होते. यामुळे सहा ते बारा महिन्यात १0 ते १५ किलो वजन घटते.

विशेष म्हणजे, ही विनाऑपरेशन सर्जरी आहे आणि पाहिजे तितके वजन कमी झाल्यावर फुगा पुन्हा काढता येतो.

डॉ. दीप गोयल सांगतात की, 'लग्नाचा सिझन जसा जसा जवळ येत आहे तशी मुलींमध्ये वाढत्या वजनाविषयी चिंता वाढतेय. ज्यांचा विवाह होणार आहे अशा अनेक तरुण मुली वजन कमी करण्यासाठी ही बलून सर्जरी करत आहेत.'

मात्र काही लोकांमध्ये फुगा काढल्यानंतर पुन्हा भूक वाढून वजन वाढण्याची शक्यता असते.

Baloon

Web Title: Weight loss balloon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.