नवरदेव होणार असाल तर हॅन्डसम लूकसाठी 'या' टिप्स फॉलो करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 17:16 IST2018-12-13T17:15:34+5:302018-12-13T17:16:42+5:30
जशी प्रत्येक नववधूला आपल्या लग्नामध्ये सुंदर दिसण्याची इच्छा असते तशीच इच्छा नवरदेवालाही असते. आपल्या लग्नामध्ये आपण सुंदर दिसावं आणि आपल्या होणाऱ्या बायकोच्या तोडीस तोड दिसावं असं त्यालाही वाटत असतं.

नवरदेव होणार असाल तर हॅन्डसम लूकसाठी 'या' टिप्स फॉलो करा
जशी प्रत्येक नववधूला आपल्या लग्नामध्ये सुंदर दिसण्याची इच्छा असते तशीच इच्छा नवरदेवालाही असते. आपल्या लग्नामध्ये आपण सुंदर दिसावं आणि आपल्या होणाऱ्या बायकोच्या तोडीस तोड दिसावं असं त्यालाही वाटत असतं. त्यासाठी सध्या मुलंही विविध आणि महागड्या ट्रिटमेंट फॉलो करताना दिसतात. तुमच्याही लग्नाची घटीका समिप आली असेल आणि लगीन घाई सुरू झाली असेल तर तुमच्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. लग्नासाठी हॅन्डसम लूक मिळवण्यासाठी या टिप्सची तुम्हाला नक्कीच मदत होईल.
योग्य डाएट आणि पूर्ण झोप
लग्नाच्या तयारीमध्ये इतकेही बिझी होऊ नका की, तुम्ही नवरदेव आहात याचाच विसर पडेल. त्यामुळे लग्नाच्या घाईगडबडीतही तुमच्या डाएटकडे दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे तुमचं डेली वर्कआऊटही सुरू ठेवा. स्किन किंवा हेअर ट्रिटमेंट करण्याचा विचार करत असाल तर लग्नाआधीच करा.
स्पा आणि फेशिअल
पुरूषांसाठी स्पा आणि फेशिअलचे अनेक प्रकार आहेत. लग्नामध्ये लोकांचं पूर्ण लक्ष नवरदेव आणि नववधूकडेच असतं. त्यामुळे तुमच्या स्किन टाइपनुसार लग्नाआधीच फेशिअल करून घ्या. तसेच हेयर स्पाही लग्नाआधीच करून घ्या.
वेडिंग लूक आणि सर्व ड्रेस आधीच ट्राय करा
लग्नाच्या दिवशी जे कपडे परिधान करणार आहात ते घालून त्यावरचा लूक आधीच ठरवून ठेवा. तसेच लग्नामध्ये परिधान करणाऱ्या कपड्यांचं फिटिंग वैगरे चेक करून पाहा.
लग्नाच्या दिवशी करा मेकअप
लग्नाच्या दिवशी आपल्या स्किन टोननुसार मेकअप करा. फक्त मेकअप करताना व्यस्थित करा. कोणत्याही प्रकारची एक्सपेरिमेंट करू नका, नाहीतर लूक बिघडण्याची शक्यता असते.