शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

अंगावरील अनावश्यक केस काढण्यासाठी योग्य पद्धत कोणती? लक्षात घ्या ४ प्रमुख गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 19:30 IST

तुमच्या त्वचेसाठी काय योग्य आहे हे जर तुम्हाला समजलं तर वॅक्सिंग करण्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही. शेव्हिंगपेक्षा वॅक्सिंग श्रेयस्कर असण्यामागं चार प्रमुख आणि वेगवेगळी कारणं आहेत.

बहुतांश लोक केसांच्या जास्त वाढीमुळे काळजीत असतात. अशावेळी वॅक्सिंग करावं की शेव्हिंग असा प्रश्न त्यांना पडतो. तसंच याबाबतचा निर्णय घेणंही त्यांना बऱ्याचदा कठीण आणि आव्हानात्मक वाटतं. या छोट्या निर्णयाचा परिणाम तुम्ही जीवन कशा पद्धतीनं जगता यावर होऊ शकतो. शेव्हिंग करणं हे सुरुवातीला अस्वस्थ करणारं वाटत तर त्या तुलनेत वॅक्सिंगला खरोखरच कमी वेळ लागतो. तुमच्या त्वचेसाठी काय योग्य आहे हे जर तुम्हाला समजलं तर वॅक्सिंग करण्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही. शेव्हिंगपेक्षा वॅक्सिंग श्रेयस्कर असण्यामागं चार प्रमुख आणि वेगवेगळी कारणं आहेत.

सहज आणि कायमस्वरूपी परिणामशेव्हिंग केल्याने काही दिवसांत तुमची त्वचा काटेरी जाणवते. त्याउलट वॅक्सिंग केल्याने तुम्हाला जवळपास तीन आठवडे तुमच्या त्वचेचा स्पर्श अगदी बाळाच्या तळहातासारखा मऊ  आणि गुळगुळीत वाटतो. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे दर काही दिवसांनी शेव्हिंग करण्यासाठी वेळ काढणं कदाचित आव्हानात्मक ठरू शकतं. वॅक्सिंग केल्यानंतर तुमची त्वचा अनेक आठवडे मुलायम राहते. कारण या क्रियेत केस मुळापासून पुन्हा वाढण्यास मदत होते.

चट्टे आणि खाज सुटण्याची समस्या निर्माण होत नाहीशेव्हिंग केल्यानंतर कापल्यामुळे जखम होऊ शकते. तुम्हीच एकच रेझर वारंवार वापरत असाल आणि तुमच्या त्वचेला कापलं तर संसर्ग होण्याचा धोका असतो. रेझरमुळे कापल्याने वेदना होऊ शकतात. वॅक्सिंगमुळे असा कोणताही त्रास न होता डिपिलेशन अर्थात केस काढून टाकणं शक्य आहे. वॅक्सिंगमुळे चांगले परिणाम दिसून येतात. शेव्हिंगमुळे रेझर बर्न, जळजळ, केसांची वाढ लवकर होणं, केसांच्या ग्रंथींना  सूज येणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या उलट वॅक्सिंगमुळे त्वचेवरचा थर सहज निघून जातो.

एक्सफोलिएशनची खात्रीत्वचेच्या मृत पेशींचा थर सहजपणे निघून जाणं हा वॅक्सिंगचा अजून एक फायदा आहे. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्यामुळे तुमची त्वचा मऊ होते. गरजेनुसार तुम्ही वॅक्सिंगच्या काही दिवसआधी एक्सफोलिएट  करू शकता. केसांची लवकर वाढ टाळण्यासाठी तुम्ही वॅक्सिंगच्या काही दिवस आधी तुमची त्वचा एक्सफोलिएट करा. शेव्हिंग केल्यानंतर त्वचा गडद दिसत असल्याचं निरीक्षण काही जण नोंदवतात. तथापि वॅक्सिंग केल्यानंतर असं होत नाही. त्वचेवरील मृत पेशींचा थर काढून टाकण्यासोबतच वॅक्सिंगमुळे हायपरपिग्मेंटेशन  टाळण्यास ही मदत होते.

पुन्हा वाढणारे केस असतात पातळजर तुम्ही नियमित वॅक्सिंगचं शेड्यूल पाळलं तर तुमच्या केसांची वाढ कमी वेगानं होऊ शकते. तुम्ही वॅक्सिंग नियमित केलं तर केस परत वाढल्याचं तुमच्या फारसं लक्षातही येणार नाही. वारंवार वॅक्सिंग केल्यामुळे तुमच्या केशग्रंथी कमकुवत आणि बारीक दिसू लागल्याचं दिसून येईल. शेव्हिंगमुळे या ग्रंथीच्या जाड भागावरील केस तुटतात. त्यामुळे ते पुन्हा दाट होतात.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स